पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते मुंबईतील फिनटेक कार्यक्रम आणि वाढवण बंदराच्या भूमिपुजनासाठी पालघरला येत आहेत. दरम्यान राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेबाबत पंतप्रधानांनी माफी मागवी यासाठी मुंबई काँग्रेसने आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान पंतप्रधानांच्या दौऱ्यात अडथळा होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी मालवणीचे आमदार अस्लम शेख यांना ताब्यात घेतले आहे. दुसरीकेड काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनाही डोंगरी पोलीस स्टेशनला बसवले आहे.
दरम्यान मोदी यांच्या दौऱ्याविरोधात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडही आक्रमक झाल्या आहेत. मात्र, आज सकाळपासूनच त्यांच्या घराबाहेर थांबत पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध केले आहेत. यावेळी संतापलेल्या गायकवाड यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत सरकारविरोधात घोषणाबाजी केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
यावेळी प्रतिक्रिया देताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या, "मला रोखण्यासाठी, काँग्रेस नेत्यांना रोखण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून धरपकड सुरू आहे."
दुसरीकडे विधान परिषदेचे काँग्रेस आमदार भाई जगताप यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.