PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला होणार शिवडी- न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प लोकार्पण

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला होणार शिवडी- न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प लोकार्पण
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला ‘अटल सेतू शिवडी- न्हावा शेवा सी लिंक’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्‍घाटन होणार आहे. या वेळी होणाऱ्या कार्यक्रमास ५० हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत.

त्याअनुषंगाने उलवा नोड येथे राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन आढावा बैठक पार पडली. उरण-पनवेलमध्ये होणारे विकासात्मक टप्पे पाहता हा परिसर एक हब म्हणून पुढे येत आहे. नवी मुंबई विमानतळ आणि अटल सेतू या सी-लिंकमुळे नवी मुंबई थेट मुंबईशी जोडली जाणार आहे.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला होणार शिवडी- न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प लोकार्पण
PM Modi: '2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना रोखणे जवळजवळ अशक्य'; ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा

याचा फायदा रायगड, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पालघर अशा सर्वच भागांतील प्रवाशांसाठी होणार आहे. सोबतच या भागातील गावांचा विकासही झपाट्याने होणार आहे. त्याअनुषंगाने ‘अटल सेतू शिवडी- न्हावा शेवा सी लिंक’ हा प्रकल्प येथील लोकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्याचे लोकार्पण शुक्रवारी १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

यानिमित्ताने रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स येथे झालेल्या बैठकीस माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, माजी आमदार धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, वाय. टी. देशमुख, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मोहपे, कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यासोबत स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला होणार शिवडी- न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प लोकार्पण
PM Modi: '2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना रोखणे जवळजवळ अशक्य'; ब्रिटिश वृत्तपत्राचा दावा

‘अटल सेतू’च्या उद्‍घाटनाच्या निमित्ताने नवी मुंबई विमानतळ परिसरातील भव्य मैदानावर एका सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या सभेसाठी ५० हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असून या सर्व नागरिकांची बैठक व्यवस्था, प्रवास, अल्पोपाहार आदी व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी बैठकीला आमदार रवींद्र चव्हाण यांनी मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना उपस्थितांना दिल्या.

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारीला होणार शिवडी- न्हावा शेवा सी लिंक प्रकल्प लोकार्पण
Modi Guarantee: "मोदींची गॅरंटी हा निवडणूक विजयाचा फॉर्म्युला नव्हे तर..."; PM मोदींनी स्पष्टच सांगितलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.