PM Modi In Mumbai: मिशन विधानसभा! पीएम मोदी आज मुंबईत, 29 हजार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण

Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला राज्यात फक्त 17 जागा जिंकता आल्या होत्या.
PM Narendra Modi In Mumbai
PM Narendra Modi In MumbaiEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबईतून सुमारे 29,400 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान संध्याकाळी 5.30 वाजता मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये पोहोचतील, जिथे ते रस्ते, रेल्वे आणि बंदर क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता पंतप्रधान वांद्रे कुर्ला संकुलातील आयएनएस टॉवर्सचे उद्घाटन करतील.

गेल्या काही महिन्यांमध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक वेळा महाराष्ट्राचा दौरा केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधान सभा निवडणुकांच्या दृष्टीने पंतप्रदान सतत महाराष्ट्राचे दौरे करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याविषयी माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, पंतप्रधान नवी मुंबईतील तुर्भे येथे मध्य रेल्वेच्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग आणि गती शक्ती मल्टीमॉडल कार्गो टर्मिनलची पायाभरणी करतील. यासोबतच लोकमान्य टिळक टर्मिनस येथील नवीन प्लॅटफॉर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म 10 आणि 11 च्या विस्ताराचे काम ते राष्ट्राला समर्पित करणार आहेत.

एमएमआरडीएच्या प्रवक्त्याने सांगितले की, ठाणे-बोरिवली बोगदा प्रकल्प 16,600 कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून जाणारे ट्यूब बोगदे बोरिवलीतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि ठाण्यातील घोडबंदर रोड यांच्यात थेट संपर्क निर्माण करतील.

ते पुढे म्हणाले की, 11.8 किलोमीटर लांबीचा बोरिवली ठाणे लिंक रोड बांधल्याने ठाणे ते बोरिवली हे अंतर 12 किलोमीटरने कमी होणार असून वेळ एक तासाने कमी होणार आहे.

PM Narendra Modi In Mumbai
MLC Election: १०० कोटी अन्… शरद पवारांच्या आमदाराने सांगितला फुटलेल्या मतांचा रेट

लोकसभेच्या निकालानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईत

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईत येत आहेत. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन १२ जुलै रोजी संपले. पंतप्रधान मोदी आज विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणीनंतर पश्चिम उपनगरातील नेस्को सेंटर (गोरेगाव) येथे एका सभेला संबोधित करणार आहेत.

या सभेच्या तयारीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला राज्यात फक्त 17 जागा जिंकता आल्या होत्या.

PM Narendra Modi In Mumbai
Maharashtra MLC Election Result News Updates : काँग्रेसची ८ मते फुटली, विधान परिषदेचा संपूर्ण निकाल जाहीर

पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्ना रिसेप्शला ते उपस्थित राहू शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ट्रायडेटन हॉटेलच्या आजूबाजूच्या इमारती सुरक्षित केल्या जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.