क्रीडापटू साक्षी पुन्हा चालणार, कृत्रिम पाय बसवण्यासाठी शस्त्रक्रिया

sakshi dabhekar
sakshi dabhekarsakal media
Updated on

मुंबई : पूरस्थितीत पोलादपूर (poladpur flood) तालुक्यातील केवनाळे गावात (kevnale village) एका दोन महिन्याच्या मुलाला वाचवताना भिंत अंगावर कोसळून साक्षी दाभेकर (sakshi dabhekar) (वय 14) ही क्रीडापटू जबर जखमी झाली. तिच्यावर सध्या केईएम रुग्णालयात (kem hospital) उपचार सुरु असून तिला आपला डावा पाय गमवावा लागला आहे. पण, साक्षीला पुन्हा नवा पाय (Artificial leg) मिळणार आहे. ज्यामुळे ती पुन्हा पायावर उभी राहू शकणार आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयात तिच्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाली की तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख (dr hemant deshmukh) यांनी सांगितले. (poladpur flood-sakshi dabhekar-kem hospital-Artificial leg-dr hemant deshmukh-nss91

पोलादपूरहून तिला तातडीने मुंबईत हलवण्यात आल्यानंतर डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला आहे. या मुलीची घरची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असल्याने पुढील उपचाराच्या लाखो रुपयांचा खर्च पालिका करणार आहे. ही मुलगी धावपटु आहे, कब्बडी आणि खो खो तालुकास्तरावर खेळते. पण, आता तीला पाय गमवावा लागलाय. कृत्रिम पाय बसवण्यासाठी मदतीचं आवाहन केलं जात होतं. त्यानुसार, आता बर्‍याच सामाजिक संस्था आणि पालिकेने पुढाकार घेतला आहे.

sakshi dabhekar
नॅशनल पार्कमध्ये पाच महिन्यांमध्ये ५ प्राण्यांचा मृत्यू !

केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या साक्षीवर उपचार सुरू असून सर्व उपचारांचा खर्च पालिकेकडून होणार आहे. तिला कृत्रिम पाय बसवला जाणार आहे. तिच्या नातेवाईकांना राहण्याची सोय केली गेली आहे. पायाच्या संवेदना पूर्णपणे जाऊ नये म्हणून फँटम लिम्ब म्हणजेच हालचाल करण्यासाठी पाय लावला जाणार आहे. किमान 6 महिने तिची जखम पूर्णपणे बरी होण्यास लागतील त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल.

महापौरांनी घेतली साक्षीची भेट

साक्षीने जीव धोक्यात घालून त्या बाळाला वाचवण्याचे जे धाडस दाखवले त्या धाडसाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली. त्यासोबतच मदतीचा हात म्हणून महापौर किशोरी पेडणेकर व आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी  या मुलीला एक लाख रुपयांचा रोख निधी आर्थिक मदत म्हणून तिच्या सुपूर्द केला. तसेच नगरसेवक अनिल कोकिळ यांनी 25 हजारांचा धनादेश दिला.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केईएम रुग्णालय संपूर्णपणे मोफत उपचार करणार असून आधी जयपुर फुट आणि त्यानंतर बारा लक्ष रुपये खर्च करून जर्मनीच्या ऑटोबोक कंपनीचे सारबो रबर पाय मोफत बसवणार आहे. यासाठी डॉक्टर संपूर्ण लक्ष ठेवून असून ती पूर्वीसारखीच चालेल, धावेल असा विश्वास असल्याचे महापौरांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.