देवदर्शनाच्या बहाण्याने चांदीच्या पादुका चोरणाऱ्यास अटक

तरुणाने आधी दरबारातील देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर चांदीच्या पादुका उचलून पोबारा केला.
Arrested
Arrestedsakal
Updated on

उल्हासनगर : देवदर्शनाच्या बहाण्याने दरबारात येऊन चांदीच्या पादुकांवर डल्ला मारणाऱ्या चोराला विठ्ठलवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पादुका चोरताना चोर मंदिरातील सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला होता. त्याआधारावर पोलिसांनी चोराचा माग घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. नितीन पाईकराव (वय ३२) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चांदीच्या पादुका हस्तगत करण्यात आल्या आहेत. (Theft In Temple At Ulhasnagar)

Arrested
लग्न म्हणजे क्रूरतेचा परवाना नव्हे, वैवाहिक बलात्कारावर HCची टिप्पणी

याबाबत अधिक माहिती अशीकी, उल्हासनगरच्या कॅम्प ४ मधील सेक्शन ३० मध्ये गुरुनानक दरबार आहे. या दरबारात मंगळवारी (ता.२२) रात्री सव्वा नऊच्या सुमारास एक तरुण देवदर्शनासाठी आला. अंगात लाल रंगाचा शर्ट असलेल्या तरुणाने आधी दरबारातील देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर देवाच्या चांदीच्या पादुका उचलून रुमालात गुंडाळल्या. त्यानंतर पुन्हा देवाचे दर्शन घेत नमस्कार करून पोबारा केला. काही वेळाने पादुका जागेवर नसल्याची बाब मंदिराच्या सेवेकऱ्यांच्या लक्षात आली असता त्यांनी सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये लाल रंगाचा शर्ट घातलेला एक तरुण पादुका चोरताना आढळून आला.

Arrested
६० हजार ग्राहकांना आडवं गेलं 'मांजर'; भोसरी-आकुर्डीला अंधारात राहण्याची वेळ

सेवेकऱ्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्रपाळीला असणारे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक हर्षल राजपूत, हवालदार रामदास मिसाळ, पोलिस नाईक जितेंद्र चित्ते, पांडुरंग पथवे, कॉन्स्टेबल गणेश राठोड, वैजिनाथ राख, गणेश डमाळे, हरेश चव्हाण यांनी चोराचा शोध घेऊन त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.