बापरे! मुंबईकडे येत होतं तब्बल 'इतक्या' किलोचं 'संकट'..पण पोलिसांनी अडवला ट्रक आणि... 

police checkings trucks
police checkings trucks
Updated on

मुंबई:  मुंबईत येणारा साडे सहाशे  किलो गांजा अहमदनगर येथे पकडण्यात महसुल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले असून आरोपींनी ओडिसा, नागपूर येथील जंगलामधून लपवून हा गांजा आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत एक कोटी रुपये आहे.

ईश्वर जालींदर दिसले, किरण बाळू साठे व मारुती राजेंद्र जारे अशी अटक आरोपींची नाव आहेत. हे आरोपी स्वीफ्ट कारमधून गांजा असलेल्या ट्रकच्या पुढे जात होते. त्यावेळी डीआरआयच्या अधिका-यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांना अहमदनगर येथून अटक करण्यात आली आहे. 

आरोपींनी ओडिसा व त्यानंतर नागपूर येथून या ट्रकला एस्कॉर्ट करत आणले होते. लॉकडाऊनमुळे अंमली पदार्थांचा तुडवडा पडल्यामुळे पैशांसाठी आरोपींनी गांजाची तस्करी करण्याचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.

ट्रकमधून 637 किलो गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत 95 लाख 55 हजार 300 रुपये आहे. पण सध्या लॉकडाऊनच्या काळात अंमली पदार्थांचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे दुप्पट भावाने अंमली पदार्थांची विक्री होत आहे. प्राथमिक तपासात उडीसा येथे हा गांजा उगवण्यात आला असून तेथील जंगल परिसराशी संबंधीत आहे. 

याशिवाय सध्या सर्वत्र नाकाबंदी असल्यामुळे पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून आरोपी या ट्रकला एस्कॉर्ट करत होते. पण लॉकडाऊनच्या काळातही आरोपींनी एका राज्यातून दुस-या राज्यात हा माल आणला आणि हा प्रकार स्थानिक यंत्रणांच्या लक्षात आला नाही, ही आश्चर्याची बाब असल्याचे अधिका-याने सांगितले. आरोपीना याप्रकरणी नागपूर न्यायालयात हजर करण्यात आले असून 29 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

police arrested  3 people for this very serious reason read full story 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.