नालासोपारा : पाच सराईत आरोपींना अटक; १६ गुन्हे उघड

crime
crimeSakal media
Updated on

नालासोपारा : वसई-विरार (vasai-virar) परिसरात घरफोडी, चोरी करून (robbery crime) फरारी झालेल्या पाच सराईत आरोपींच्या मुसक्या (Five culprit arrested) आवळण्यात वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या आरोपींना वालीव, कासारवडवली, पालघर, पोलिस ठाणे हद्दीतील १६ गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, वाहन, मोटारसायकल, मोबाईल असा तब्बल तीन लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत (property seized) केला असल्याची माहिती वालीवचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली आहे.

crime
"रिक्षा खरेदी करताना पार्कींग विचारली जाते, मग 'कार'साठी का नाही?"

कल्पेश शिंदे (२०), विशाल मंडळ (२०), वारीस खान (२६), सुरज उर्फ उस्मान मुक्तार खान (२२), रॉनी जोसेफ फर्नाडिस असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत. या चोरांच्या टोळीने मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयासह ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यातील परिसरात चोरी, घरफोडी, वाहन चोरी करत धुमाकूळ घातला होता. याबाबतचे सर्वाधिक गुन्हे वालीव पोलिस ठाणे हद्दीत दाखल होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास बर्वे यांनी गुन्हे प्रकटीकरणचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश फडतरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार मुकेश पवार, मनोज मोरे, सचिन दोरकर, किरण म्हात्रे, राजेंद्र फड, सतीश गांगुर्डे यांच्यासह अन्य पोलिसांच्या पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तांत्रिक बाबी आणि गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही यांचा आधार घेऊन या पाच आरोपिंना वेगवेगळ्या भागातून अटक केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()