Mumbai Crime : चाकूचा धाक दाखवून प्रवाशास लुटणाऱ्या दोघांना अटक; कल्याण स्टेशन परिसरातील घटना

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉक खाली एका टोळीने एका पादचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली
police arrested two accused who robbed near skywalk in kalyan station
police arrested two accused who robbed near skywalk in kalyan station Sakal
Updated on

डोंबिवली - कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील स्कायवॉक खाली एका टोळीने एका पादचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासातच पोलिसांनी टोळीमधील 2 जणांना अटक केली असून मायकल शेख आणि काजोल पाटील अशी अटक आरोपींची नावे अजुम 2 जनांचा शोध पोलीस घेत आहेत.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात गर्दुल्ले, मद्यपी, वारांगनांचा सर्रास वावर असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. या गर्दुल्ल्यांकडुन अनेकदा रात्री अपरात्रीच्या सुमारास लोकांना लुबाडण्याचा, महिलांची छेड काढण्याच्या घटना देखील कल्याण स्टेशन परिसरात घडल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे नागरिकांची सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

त्यातच मंगळवारी रात्री संतोष केसरी या प्रवाशाला एका टोळीने लुबाडल्याची घटना उघडकीस आली. संतोष हा उत्तर प्रदेश येथे जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात गाडी पकडण्यासाठी आला होता.

त्याला भूक लागल्याने हॉटेलच्या शोधात तो शोधत कल्याण स्टेशन जवळील स्काय वॉकच्या जीन्या खालून जात होता. तेथील अंधाराचा फायदा घेऊन दोन पुरुष व दोन महिला अशा 4 जणांच्या टोळक्याने त्यांना हटकले. चाकूचा धाक दाखवत संतोष यांना मारहाण केली व त्यांच्या जवळील 18 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत पळ काढला.

घडलेल्या घटनेनंतर संतोष यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी या लुटारू टोळी विरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. अवघ्या काही तासातच पोलिसांनी स्टेशन परिसरात सापळा रचत या टोळीमधील दोन जणांना अटक केली.

मायकल शेख आणि काजोल पाटील या दोघांना अटक करण्यात आले आहे. तर उर्वरित 2 जनांचा शोध घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी तानाजी वाघ या प्रकरणाच्या तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.