Police Bharti 2024: महाराष्ट्र सरकारने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पोलीस जाहीर केली आहे. त्यामुळे अनेक मैदानावर चिखल साचला होता. दरम्यान जिथे पाऊस तिथे पोलीस भरती स्थगित करण्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
अमरावती, सोलापूर, नांदेडमध्ये पोलीस भरती पुढे ढकण्यात आली आहे. राज्यातील पोलीस भरतीवरुन राजकारण तापले होते. अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केले होते.
आधीच मैदानी चाचणीला विलंब झालेला असल्याने तयारी करणार्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मात्र, पावसाळी वातावरणामुळे मैदानी चाचणी घेण्यात अडचणी येत आहेत.
ज्या जिल्ह्यात पाऊस त्याठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आपल्याला कल्पना आहे पुढे पाऊस वाढणार आहे. त्यानंतर आचारसंहीता लागणार आहे. या चाचण्या खूप पुढे गेल्या तर मुलाच्या भविष्यावर देखील परिणाम होतो. कारण अनेक मुलांसाठी ती शेवटची चाचणी ठरते. अनेक लोकांचे वय निघून जाते.
मात्र ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे पुढच्या तारखा देण्यात आल्या. जिथे पाऊस नाही तिथे चाचण्या सुरु आहेत. यासोबत मुल खूप मोठ्या प्रमाणात जात असल्यामुळे त्यांची व्यवस्था करण्यासाठी देखील सांगितले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यात एआयचा वापर-
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एआयचा वापर कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत होणार आहे. एखादा गुन्हा घडवल्यानंतर गुन्हेगाराचे तपासणी असेल, सिसीटीव्ही तपासणी असेल. गाडीची नंबर प्लेट शोधण्यासाठी कॅमेरा नसला तरी एआयचा वापर करुन शोधू शकते.
क्राइम सोडवण्यासाठी, ट्रॅफिकच्या अडचणी देखील एआयमुळे कमी होऊ शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.