Kalyan: आजपासून १४ दिवस भावी पोलिसांची बाळे गावात कसोटी , शिपाई भरतीसाठी यंत्रणा सज्ज

Police Bharti update: उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे.
Kalyan: आजपासून १४ दिवस भावी पोलिसांची बाळे गावात कसोटी ,  शिपाई भरतीसाठी यंत्रणा सज्ज
shipai police bharti 2024 kalyan sakal
Updated on

Dombivli: राज्यभरात विविध पदांसाठी पोलीस भरती घेतली जाणार आहे.आज ठाणे जिल्ह्यात भरती राबवली जाणार असून ३४४ पदांसाठी २३ हजार ४५६ अर्ज आले आहेत. यासाठी राज्य राखीव नवी मुंबई गट ११ बाळे यांची पोलीस भरतीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

पदभरतीसाठी उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावीपर्यंत आहे. या भरतीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या उमेदवारांसाठी राहण्याची व भोजनाची व्यवस्था पोलीस कॅम्प मध्ये करण्यात आली आहे.

Kalyan: आजपासून १४ दिवस भावी पोलिसांची बाळे गावात कसोटी ,  शिपाई भरतीसाठी यंत्रणा सज्ज
Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, हरयाणा, झारखंड विधानसभेची निवडणूक 'या' तारखेला होणार जाहीर?

ठाणे जिल्ह्यातील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. या भरतीसाठी आवश्यक पूर्व मैदानी कामांसह इलेक्ट्रॉनिक यंत्रणा देखील सज्ज झाल्या आहेत. विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या उमेदवारांसाठी प्रशासनाकडून राहण्याची आणि भोजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कॅम्प मध्ये सुरुवातीला उमेदवारांचे ओळखपत्र तपासले जातील. उमेदवारांचे शैक्षणिक कायदपत्र तपासल्यानंतरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.उमेदवारांची हजेरी घेऊन छाती / उंची मोजमाप करुन कागदपत्र तपासण्यात येतील व बायोमॅट्रीक हजेरी घेऊन उमेदवारांना त्यांचा चेस्ट क्रमांक वाटप करुन शारिरीक चाचणी करीता मैदानावर पाठविण्यात येईल. मैदानावर उमेदवारांची शारीरिक चाचणीमध्ये पुरुषाची १००मीटर / १६०० मीटर व महिलांची १०० मीटर/८०० मीटर धावण्याची चाचणी कृत्रिम धावपट्टीवर घेण्यात येणार आहे. ठाण्यात भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्याकरीता RFID पध्दतीचा वापर करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये असंही आवाहन करण्यात आलं आहे.

Kalyan: आजपासून १४ दिवस भावी पोलिसांची बाळे गावात कसोटी ,  शिपाई भरतीसाठी यंत्रणा सज्ज
Mumbai Local : बदलापूरकरांची सोय झाली डोंबिवलीकर वंचित, छताअभावी प्रवाशांचे हाल

जर पावसामुळे मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची तारीख दिली जाणार आहे. मात्र तब्बल ३४४ पदांसाठी २३,४५६ अर्ज आले असल्याने २००० खेळाडूंची शारिरीक चाचणी केली जाणार आहे.या पोलीस भरतीसाठी सुमारे तब्बल ३१ अधिकारी आणि २०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

या संपूर्ण भरती प्रक्रियेचा आढावा समादेशक अधिकारी दिलीप खेडेकर यांनी घेतला आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार परिसरात होणार नसून असं कोणाला दिसून आल्यास त्यांनी संबंधित पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.