मुंबई : कोरोना विषाणूमुळे सध्या सॅनिटायझरची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याचा पुरवढा देखील सध्या सुरु आहे. मात्र सॅनिटायझरच्या पुरवढ्याआडून आता जीवघेण्या पदार्थाची तस्करी करण्यात येतेय. अशीच एक घटना आता समोर आलीये.
भिवंडीतून मुंबईत सॅनिटायझरच्या बॉक्समधून जीवघेण्या गोष्टींची तस्करी करण्यात येत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने उघड केलंय. यामध्ये 38 लाखांचा शुद्ध पान मसाला जप्त केला.
सॅनिटायझरच्या नावाखाली कंटेनरमधून गुटख्याची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भिवंडीमधील राहनाळ इथे उघडकीस आला. HR-55 AH 4756 या वाहनांची झाडाझडती केली असता महाराष्ट्र्रात बंदी असलेला शुद्ध पान मसाला या प्रतिबंधित पदार्थनाचा 37 लाख 80 हजार किंमतीचा माल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केला आहे.
त्याचप्रमाणे 14 लाख रुपये किमितीचा शॅम्पू देखील या वाहनातून जप्त करण्यात आला आहे. याच शॅम्पूच्याआडून प्रतिबंधित पण मसाल्याची वाहतूक करण्यात येत होती. या साठ्याचा ट्रान्सपोर्टर पंकज मोहन असोसिएट्स असून ड्रायव्हर राकेशकुमार अयोध्याप्रसाद याला आता ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरचा माल साठवण करणाऱ्या विरोधात देखील अन्नसुरक्षा कायदा 2006 भारतीय दंड संहिता कायद्यानुसार नारपोली पोलिस स्टेशन याठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यानंतर या मुद्देमालाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती अन्न औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिले आहे.
police caught pure prohibited pan masala transported through emergency services vehicle
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.