बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट; मुरबाडमध्ये दोघांवर गुन्हा; तर एकाला अटक

Fake Doctor arrested
Fake Doctor arrestedesakal
Updated on

सरळगाव : मुरबाड तालुक्यात बोगस डॉक्टरांची (fake doctor) शोधमोहीम आरोग्य खात्याने सुरू केली आहे. विभागाच्या तपासणीत दोन बोगस डॉक्टर सापडले असून त्यांच्याविरोधात टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल (Police complaint) करण्यात आले आहेत. यापैकी एकाला अटक (culprit arrested) केली असून दुसरा फरार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Fake Doctor arrested
नवी मुंबई प्रभाग रचना; गणेश नाईक न्यायालयात दाद मागणार

धसई येथील पांडुरंग घोलप या बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारांमुळे तिघांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर झोपी गेलेली आरोग्य यंत्रणा उशिरा का होईना जागी झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने मोहीम हाती घेतली आहे. तालुका दुर्गम भागाचा असल्याने अनेक बोगस डॉक्टर असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुरबाड तहसीलदार संदीप आवारी, टोकावडे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष दराडे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती बोटे यांच्या उपस्थितीत बोगस डॉक्टरांच्या शोधमोहिमेला सोमवार (ता. ३१)पासून सुरुवात करण्यात आली. रात्री ८ वाजेपर्यंत ही मोहीम सुरू होती.

मोरोशीत दवाखाना सील

मोरोशी येथील डॉ. प्रमोद धनगर याच्या दवाखान्यावर धाड टाकली असता तो गायब असल्याचे निदर्शनास आले. बोगस वैद्यकीय परवाना आढळून आल्याने औषधसाठा जप्त करून दवाखाना सील करण्यात आला. टोकावडे पोलिस ठाण्यात बोगस डॉक्टराविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बोगस डॉक्टर दुसऱ्यांदा अटकेत

टोकावडे येथे डॉ. व्ही. एम. भुरभुडा याच्या दवाखान्यावर धाड टाकली असता बाहेर बी.ए.एम.एस. पदवी असल्याचा बोर्ड होता; मात्र त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्रे नसल्याने तो रुग्णांची फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले. दवाखान्यात झडती घेतली असता एका मोठ्या बॅगमध्ये औषध साठा सापडल्याने दवाखाना सील करून त्याला अटक करून टोकावडे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे या बोगस डॉक्टरला दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली असून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. तसेच न्यायालयात केस सुरू आहे.

Fake Doctor arrested
अनिल परबांचं रिसॉर्ट पाडा... केंद्राचे आदेश जारी

दवाखान्याबाहेर वैद्यकीय वस्तू

उमरोली येथे एका दवाखान्यावर धाड टाकली असता दवाखान्याला कुलूप लावल्याचे निदर्शनास आले. उघड्या खिडकीतून पाहिले असता रुग्णांना झोपण्यासाठी खाटा असल्याचे समोर आले. दवाखान्याबाहेरील जागेत शोध घेतला असता खोक्यांमध्ये औषधांच्या बाटल्या, इंजेक्शन, सलाईन निडल्स् भरून ठेवल्याचे आढळून आले. या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत; मात्र दवाखान्यात उपचार करणाऱ्या डॉक्टरचे नाव समजू न शकल्याने खोल्यांच्या मालकाला दोन दिवसांत माहिती देण्याची समज देण्यात आली आहे.

तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकण्याचे काम सुरू राहणार आहे.

- डॉ. भारती बोटे, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुरबाड.

रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना पाठीशी न घालता त्यांच्यावर कठोर कारवाई सुरू आहे. फरार बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. आपल्या गावात असलेल्या डॉक्टरांबद्दल संशय असल्यास तातडीने तालुका वैद्यकीय अधिकारी यांना माहिती द्यावी.

- संदीप आवारी, तहसीलदार, मुरबाड

सरळगाव : बोगस डॉक्टरच्या दवाखान्यात झडती घेताना आरोग्य अधिकारी. (छायाचित्र : नंदकिशोर मलबारी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.