नवी मुंबई : मोटारसायकल विक्रीच्या (bike selling) बहाण्याने एका भामट्याने चक्क पोलीस कर्मचाऱ्याला गंडा (fraud to police) घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आदिल गोले (Culprit adil gole) याच्याविरोधात नवी मुंबईच्या वाशी पोलीस ठाण्यात (Vashi Police station) गुन्हा दाखल (police FIR) करण्यात आला आहे. (police complaint on accused adil gole in vashi police station in fraud crime)
सदर पोलीस कर्मचारी वाशी ठाण्यात कार्यरत असून २०१८ मध्ये त्याची ओळख आदिल गोले याच्याशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली होती. पोलिसाने सव्वा लाख रुपये किमतीची मोटारसायकल विकत घेतली होती. मात्र काही महिन्यांनंतर आर्थिक अडचण आल्याने त्याने ९० हजारांत मोटारसायकल विकण्यासाठी काढली होती.
आदिल याने त्याला मोटारसायकल विकून देण्याचे आश्वासन दिले आणि जानेवारी २०२० मध्ये मोटारसायकल मूळ आरसी बुक व आधार कार्डचे कलर झेरॉक्स घेऊन गेला. त्यानंतर वेळोवेळी विविध कारणे सांगून वेळ मारून नेली. काही दिवसांनंतर रस्त्यावर भेटलेल्या आदिलने महिन्याभरात ८० हजार देण्याचे कबूल केले. मात्र आजतागायत मोटारसायकल अथवा ८० हजार रुपये न दिल्याने आदिलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.