Mumbai Crime : पोलिसांच्या वेशात येऊन कोट्यवधीला गंडा घालणाऱ्या टोळीला राजस्थानमधून अटक

दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून चौघांनी 3.75 कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांसह व्यापारी व त्याच्या कर्मचाऱ्याचे शीव परिसरातून अपहरण केले होते.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

मुंबई - दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करून चौघांनी 3.75 कोटी रुपयांच्या हिऱ्यांच्या दागिन्यांसह व्यापारी व त्याच्या कर्मचाऱ्याचे शीव परिसरातून अपहरण केले होते. याप्रकरणी राजस्थानमधील देराजसर येथून महेंद्र व मनोज या दोन संशयीत आरोपीना अटक केली आहे. या दोघांनी किशननाथ व अशोक या दोन आरोपींच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती उघड झाली आहे.

आरोपींकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याला इनोव्हा गाडीत बसवून भिवंडी येथे नेले आणि तेथे मारहाण करून त्याच्या ताब्यातील हिऱ्यांचे दागिने व रोख असा 2 कोटी 62 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला होता.

तोतया पोलिसांकडून लूट

या प्रकरणी तक्रारदार हरिराम घोटिया सध्या हैदराबाद येथे दागिने घडवण्याचे काम करतात. घोटियाचे मालक संतोष नारेडी 27 लाख रुपये रोख आणि एकूण 2 कोटी 62 लाख रुपयांचे दागिने घेऊन 31 मे रोजी मुंबईत आले होते.

Crime News
Village Migration : पुणे जिल्ह्यातील अतिधोकादायक गावांचे स्थलांतर रखडले

सहकारी प्रशांत चौधरी व मालक संतोष नरेडी यांच्यासोबत घोटिया यांना कामानिमित्त बीकेसी येथे जायचे होते. त्यासाठी ते शीव परिसरातील सायन पनवेल हायवे येथील बस थांब्यावर थांबले होते. त्यावेळी चार व्यक्ती इनोव्हामधून तेथे आल्या व त्यांनी ओळखपत्र दाखवून आपण दिल्ली गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगितले. त्यानंतर घोटिया व त्यांचे मालक संतोष यांना आपल्यासोबत यावे लागेल असे दटावत आरोपींनी दोघांनाही दिल्लीला घेऊन जात असल्याचे सांगितले.

दोघांना मोटरगाडीत बसवून भिवंडी येथे नेण्यात आले. आरोपींनी तेथे निर्जनस्थळी नेऊन घोटिया याना मारहाण केली आणि त्यांच्याजवळील दागिने हिसकावले. त्यानंतर घोटिया व संतोष यांना तेथेच सोडून आरोपींनी गाडीतून पलायन केले. घोटिया यांनी याप्रकरणी शीव पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी तोतयागिरी, जबरी चोरी व अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

Crime News
Pune University : पुणे विद्यापीठाच्या गुणवत्तेची सल्लागारांनी लावली ‘वाट’

पोलीस तपास

सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून प्रथम आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यानंतर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी राजस्थानला पलायन केल्याचे पोलिसाना समजले. त्याप्रमाणे शीव पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले होते. त्यांनी राजस्थान-बिकानेर रस्ता येथील देराजसर येथून महेंद्र व मनोज या दोन संशयीतांना ताब्यात घेतले.

या दोघांनी किशननाथ व अशोक या दोन आरोपींच्या मदतीने हा गुन्हा केल्याची माहिती उघड झाली आहे. मनोज व महेंद्र यांच्याकडून 1 कोटी 10 लाख रुपयांचे दागिने, 1 किलो सोन्याची लगड व 18 लाख रुपये हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.