मुंबई : शहरातील नामांकीत कार शोरुममध्ये दूरध्वनी करून तेथील महिला कर्मचा-यांशी अश्लील संभाषण करणारा सराईत आरोपी अनेक दिवसांपासून पोलिसांचा गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी त्याच्यासाठी ‘हनी ट्रॅप’लावला आणि आरोपी सहजपणे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आरोपीने सातहून अधिक कार विक्री karanarya कंपन्यांच्या महिला कर्मचा-यांना दूरध्वनी करून त्रास दिला आहे.
हॅन्ड्री मायकल नाडर उर्फ विवेक असे अटक आरोपीचे असून तो व्यावसायाने चालक आहे. मालाडच्या मार्वे येथील बरोडा हाऊस येथे राहणारा नाडर हा मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, येथील नामांकीत कार विक्रेत्या कंपन्यांच्या कार्यालयांतील दूरध्वनी क्रमांक गुगलवरुन मिळवायचा. त्या नंबरवर फोन केल्यानंतर फोन कुठल्या पुरुषाने उचलल्यास तो फोन कट करायचा. मात्र फोन कुठल्या तरुणी किंवा महिलेने उचलल्यास त्याच्याशी अश्लील बोलायचा. नुकतीच अंधेरीतील एका कंपनीत त्याने अशा प्रकारे फोन करून महिलेशी गैरवर्तन केले.
याप्रकरणी महिलेने अंधेरी पोलिस ठाण्यात तीन महिन्यापूर्वी गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली तेवढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढला. पोलिसांनी त्याच्या नंबरच्या मदतीने सिमकार्ड वापरत असलेल्या व्यक्तीची माहिती मिळवत त्यांचे घर गाठले. मात्र चौकशीत ज्या व्यक्तींपर्यंत पोलिस पोहचले. त्यांनी स्वतःच त्याचा मोबाइल हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती. तपासादरम्यान आरोपी तीन वेगवेगळ्या चोरीच्या सिमकार्डहून हे कृत्य करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आरोपीला जाळ्यात अडकवण्यासाठी अखेर पोलिसांनी ‘हनी ट्रॅप’चावापर केला.
पोलिसांनी एका मुलीला त्याच्या संपर्कात राहून त्याचा विश्वास संपादन करण्यास सांगितले. त्याला खोट्या प्रेमाचे आमीष दाखवून भेटायला बोलावले. मात्र पहिल्या भेटीत तो आलाच नाही. दुसऱ्यादा पून्हा त्या मुलीने त्याला भेटायला बोलावले. मात्र तरीही आरोपी समोर आला नाही. दोन्ही प्रयत्न फसल्याने आरोपी जाळ्यात येण्याची शक्यता धूसर होत होती. मात्र पोलिसांनी हार मानली नाही. तिसऱ्यावेळी पोलिसांनी महिलेला आरोपीला अंधेरी एमआयडीसी परिसरातील पंपहाऊस येथे भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी आरोपी महिलेला भेटण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दरम्यान अंधेरी पोलिसांनी त्याच्या विरोधात 354 (अ),354(ड) व 509 भादवि अन्वये गुन्हा नोंद केला असून पोलिस अधिक तपास करत होता.
( संकलन - सुमित बागुल )
police finally caught seasoned accused by using homey trap
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.