नवी मुंबई : बँकेचे टेली व्हेरीफिकेशन (Bank tally verification) करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी (cyber thief) खारघरमध्ये राहणाऱ्या महिलेला लिंक पाठवून त्याद्वारे सदर महिलेच्या बँक खात्यात जमा असलेली सेवानिवृत्तीची सुमारे ६ लाख २९ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याची (Money Fraud) घटना उघडकीस आली आहे. खारघर पोलिसांनी (Kharghar Police) या प्रकरणातील अज्ञाताविरोधात (Fraud case filed) फसवणुकीसह गुन्हा दाखल केला आहे.
सुरेखा वेधिकार (वय ६०) या खारघर सेक्टर-३५ मध्ये राहण्यास असून त्यांना सेवानिवृत्तीची व ग्रॅच्युईटीची काही लाखांची रक्कम मिळाली होती. सदर रक्कम त्यांनी दोन बँक खात्यात ठेवली होती. ३० मार्च रोजी वेधिकार घरी असताना, सायबर चोरट्यांनी त्यांना एसबीआय बँकेचे टेली व्हेरीफिकेशन बाकी असल्याचा मेसेज पाठवून देत संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर दिला.
वेधिकार यांनी सदर नंबरवर संपर्क साधला असता, सायबर चोरट्यांनी एसबीआय बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांच्या व्हॉट्सॲपवर एक लिंक पाठवून दिली. सदर लिंकवर क्लिक करताच त्यांच्या बँक खात्यातून रक्कम गायब झाली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.