पोलिसांना लागली टीप, अन् मक्याच्या कणसांखाली सापडला सव्वा कोटींचा गांजा; ट्रकचा चालक फरार

पोलिसांना लागली टीप, अन् मक्याच्या कणसांखाली सापडला सव्वा कोटींचा गांजा; ट्रकचा चालक फरार
Updated on


ठाणे : चितळसर पोलिसांनी घोडबंदर रोडवर शनिवारी पहाटे तब्बल 691 किलो गांजा हस्तगत केला. मक्याच्या कणसाने भरलेल्या ट्रकमधून त्याची वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी ट्रकसह 1 कोटी 63 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. 

एका ट्रकमधून गांजा येणार असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ  निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली   निरीक्षक प्रियतमा मुठे, सहाय्यक निरीक्षक शशिकांत रोकडे,  उपनिरीक्षक धनराज केदार व त्यांच्या पथकाने पहाटे 3 वाजेच्या सुमारास घोडबंदर रोडवरील तत्वज्ञान विद्यापीठजवळ नाकाबंदी केली. या वेळी घटनास्थळी एक लाल रंगाचा ट्रक बेवारसपणे उभा असल्याचे पोलिसांना आढळून आले.  या ट्रकची तपासणी केली असता त्यात मक्याची कणसे व त्याखाली गांजा लपवून ठेवल्याचे दिसून आले.

पोलिसांनी गांजा व ट्रक जप्त केला.  ट्रकमध्ये तब्बल 691 किलो गांजा होता. तयाची किंमत 1 कोटी 38 लाख रुपये इतकी असून जप्त ट्रकची किंमत 25 लाख इतकी असल्याचे पोलिसांनी संगितले.  ट्रकचा नंबर केए 28 ए 9095 असा असून त्यावरील चालक फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. हा गांजा कोठून आणण्यात आला व तो ठाण्यात कुठे पुरवठा करण्यात येणार होता याचा तपास सुरू असल्याचे  उपआयुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.