Mumbai : सोन्याच्या अंगठीत दोष सांगून चोरी करणारे गजाआड

सराईत चोरट्यांना रामनगर पोलिसांनी केली अटक
crime
crimesakal
Updated on

डोंबिवली – हातातील सोन्याच्या अंगठीत दोष आहे. अंगठीतील दोष काढावा लागेल असे सांगत एका पादचाऱ्याची अंगठी काढून घेत त्याची फसवणूक करणाऱ्या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

मेहमूद शेख (वय 40) आणि आयुब शेख (वय 50) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन गुन्ह्यांची उकल केली असून 1 लाख 47 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

कल्याण येथील शहाड रेल्वे स्टेशन परिसरात राहणारे हनुमंत गोसावी (वय 56) हे 3 एप्रिलला सकाळी 10.45 वाजता टिळक चौकातील अनिल मेडिकल स्टोअर्समध्ये जाण्यासाठी पायी चालत जात होते. यावेळी दोघा इसमांनी त्यांना अडवून बोलण्यात गुंतविले.

crime
Mumbai : मध्य रेल्वेचा १७० वर्षांचा गौरवशाली प्रवास वाचला का ?

हनुमंत यांनी बोटात घातलेल्या सोन्याच्या अंगठी मध्ये काही तरी दोष असल्याचे त्यांनी हनुमंत यांना सांगितले. तो दोष काढण्यासाठी हातातील अंगठी दाखवा, अंगठीतील दोष काढावा लागेल असे सांगून त्यांची फसवणूक करत 18 हजार रुपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरुन त्यांनी पळ काढला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हनुमंत यांनी रामनगर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक समशेर तडवी, सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत भराडे, पोलिस हवालदार सुनील भणगे, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे,

crime
Mumbai : ऐनवेळी लोकलच्या वेळा बदलल्यामुळे प्रवाशांना करावा लागला गर्दीचा सामना

रविंद्र कर्पे, विशाल वाघ, हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड यांच्या पथकाने घटनास्थळावरचे सीसीटिव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये दोघे आरोपी आढळून आले. त्यांचा पोलिसांनी कसून शोध शिळफाटा रोड परिसरात सापळा रचून त्यांना 8 एप्रिलला अटक करण्यात आली.

त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्यात वापरलेली स्कूटर हस्तगत करण्यात आली. तसेच दोन गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली असून दुसऱ्या गुन्ह्यातील 1 लाख 23 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज जप्त केला.

अशा प्रकारे दोन्ही गुन्ह्यातून एकूण 1 लाख 47 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी हे फसवणूकीच्या गुन्ह्यातील सराईत चोर असल्याची बाब देखील उघडकीस आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.