धारावीत घरात घुसून सामूहिक बलात्कार; दोन भावांची सुटका

Dharavi Gang Rape Case
Dharavi Gang Rape Caseesakal
Updated on
Summary

'ती' घरी एकटी असताना दोन अज्ञात पुरुष तिच्या घरात घुसले आणि तिच्यावर बलात्कार केला.

मुंबई : धारावी सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या (Dharavi Gang Rape Case) तपासात दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीची शहर पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी चौकशी सुरू केलीय. ढिसाळ तपास आणि कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय दोन किशोरवयीन भावांना चुकीच्या पद्धतीनं अटक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.

धारावी पोलिसांनी सीआरपीसी 169 अन्वये दोषमुक्त करण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर, शुक्रवारी अनिल चौहान Anil Chouhan (वय 19) आणि नीलेश चौहान Nilesh Chouhan (वय 20) या दोन भावांना वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयानं प्रत्येकी 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याखाली जामिनावर सोडून दिलंय. 11 मे रोजी एका 20 वर्षीय गृहिणीनं आरोप केला होता की, तिचे सासरे मॉर्निंग वॉकसाठी निघाल्यानंतर पहाटे 5 वाजताच्या सुमारास ती घरी एकटी असताना दोन अज्ञात पुरुष तिच्या घरात घुसले, तिचे हात बांधले आणि चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी या कृत्याचं चित्रीकरणही केलं, असा आरोप तिनं केलाय.

Dharavi Gang Rape Case
भाजप बहुमताच्या एकदम जवळ; कर्नाटक विधान परिषदेवर 7 उमेदवारांची बिनविरोध निवड

तिच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला आणि सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. 16 मे रोजी धारावी पोलिसांनी सांगितलं की, आम्ही या प्रकरणाचा छडा लावला आणि चौहान बंधूंना अटक केली. पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत बलात्काराच्या आरोपाखाली अटक केलेले हे दोन तरुण गुन्ह्याच्या वेळी इतरत्र हजर असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी त्यांना सोडून दिलंय.

Dharavi Gang Rape Case
पंजाब सरकारचे धडाधड निर्णय; आता 424 व्हीआयपींची 'सुरक्षा' घेतली काढून

दरम्यान, कुटुंबीयांनी ते दोघं विलेपार्ले इथं असल्याचा व्हिडिओ सादर केला. मात्र, गुन्ह्याचं ठिकाण धारावीमध्ये सुमारे 8 किमी दूर आहे. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी उपस्थित राहणं त्यांना शक्य नाही. त्यामुळं निष्कर्षापर्यंत येण्यापूर्वी आणि या मुलांना सोडण्यापूर्वी आम्ही याची पडताळणी केलीय, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.