Ulhasnagar Crime : बांगलादेशी पॉर्न स्टार महिलेचा उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांकडून पर्दाफाश

बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट तयार करणाऱ्या बांगलादेशी पॉर्न स्टार महिलेचा उल्हासनगरातील हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने पर्दाफाश केला आहे.
police revealed a woman of bangladesh pornograpahy case which inclide fake passport documents
police revealed a woman of bangladesh pornograpahy case which inclide fake passport documentssakal
Updated on

उल्हासनगर : बनावट कागदपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट तयार करणाऱ्या बांगलादेशी पॉर्न स्टार महिलेचा उल्हासनगरातील हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या टीमने पर्दाफाश केला आहे.

नेवाळी भागात बांगलादेशी महिला राहत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे,सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप,उपनिरीक्षक संग्राम माळकर यांनी पोलीस व महिला कर्मचारी यांच्यासोबत नेवाळी भागात छापा टाकला.

आणि पंचवीशीतील बांगलादेशी पॉर्न स्टार स्टार रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे उर्फ बन्ना शेखला ताब्यात घेतले.तपासत तीने बनावट कागदपत्रांचा वापर करून भारतीय पासपोर्ट मिळवला असल्याचे उघड झाले आहे.तसेच ती राज कुंद्रा फिल्म्सशी संबंधित असून तिने प्रसिद्ध पॉर्न स्टार गेहना वशिष्टसोबत अनेक डोबे पॉर्न सीन्स शूट केले होते.ही घटना उघड झाल्यानंतर पोलीस तपासाला वेग आला आहे.

तपासादरम्यान तीच्याकडे अधिक विचारपुस केली असता तिला व तिच्या घरातील तीन सदस्यांना अचलपूर अमारावती येथे रहाणाऱ्या एका इसमाने भारतातील निवासा संदर्भात बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याने याच कागदपत्राच्या आधारे त्यांना बेकायदेशीर भारतात वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांच्या तपासानुसार,या प्रमुख आरोपीने या सर्व मुलांचे कागदपत्रांवर बाप म्हणून नाव नोंदवले आहे.त्यामुळेच त्यांना भारतात राहणे शक्य झाले आहे.

याप्रकरणी बांगलादेशी पॉर्न स्टार स्टार रिया बर्डे उर्फ बन्ना शेखला हिच्यावर IPC कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट कागदपत्रे तयार करणे), 468(फसवणुकीसाठी बनावट कागदपत्रांचा वापर), 471 (बनावट कागदपत्रांचा उपयोग) आणि 34 (सामूहिक गुन्हा) यांचा समावेश आहे. तसेच, परकीय नागरिक कायदा अंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संग्राम माळकर करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.