मुंबई : पोलिसांनी कारवाई करताना नारायण राणे (Narayan Rane) हे केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहेत याचं भान ठेवावं, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून नियोजनबद्धरित्या राणेंना अडकवण्याचा कार्यक्रम सुरु आहे, असा आरोपही यावेळी दरेकर यांनी केला. (Police should keep in mind that Narayan Rane is Union Minister Praveen Darekar)
दरेकर म्हणाले, या प्रकरणी थोडीशी सादरसुचिता पाळण्याची गरज आहे. पोलीस कुणाचे खासगी नोकर नाहीत. त्यांनी नारायण राणे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत याचं भान ठेवण्याची गरज आहे. कायद्यासमोर सर्वजण समान असले तरी केंद्रीय मंत्री आणि लोकप्रतिनिधी म्हणून काही विशेष अधिकार आहेत. त्यामुळं त्यांच्यावर पोलीस कारवाई करताना काही प्रक्रिया पार पाडावी लागते. परंतू कायदे-कानून, नियम-नीती सर्वकाही गुंडाळून आम्हाला राणेंवर कारवाई करायचीच आहे, अशी सरकारची भूमिका आहे.
नितेश राणेंना अटक करायचं आहे. त्यासाठी नारायण राणेंवर दबाव आणायचा आहे, अशी सरकारची भूमिका ठरली आहे. त्यामुळं सरकारकडून राणेंना नियोजनबद्ध पद्धतीनं अडकवण्याचा कार्यक्रम सुरु आहे, असा आरोपही यावेळी प्रवीण दरेकर यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.