Missing Girl : दोन वेगवेगळ्या घटनात घरातून पळून गेलेल्या 3 मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश

स्थानिक पोलिसांसह, गुन्हे शाखेने देखील तपास सुरू केला
Police succeeded in finding 3 girls who ran away from home mumbai police crime
Police succeeded in finding 3 girls who ran away from home mumbai police crimeesakal
Updated on

मुंबई : मुंबई पोलिसांना बेपत्ता झालेल्या मुलींच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात मुलींचा शोध घेण्यात यश आले आहे. पहिल्या घटनेत बेपत्ता झालेल्या 5 वर्षांच्या मुलीचा मुंबई गुन्हे शाखेने 36 तासांत शोध घेतला.बुधवारी हरवलेल्या मुलीची तिच्या कुटुंबीयांशी भेट झाली.

मनोरुग्ण असलेल्या आईसोबत घराबाहेर पडल्यानंतर मुलगी बेपत्ता झाली होती. हरवलेली मुलगी माटुंगा येथील बालसुधारगृहात सापडली. तेथून पोलिसांनी तिला तिच्या घरी पोहचवले. मुलीचे वडील गुजरातमधील राजकोटमधील रुग्णालयात सध्या कर्करोगाचे उपचार घेत आहेत.

मुलीची आई घटनेच्या दिवशी सोमवारी सकाळी तिच्या मुलीसह तिच्या भावाच्या घरातून चेंबूरमधून निघून गेली. राहत असलेल्या घरात पोहोचल्यावरच महिलेला मुलगी हरवल्याचे समजले. तिने आणि तिच्या कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला मात्र ती सापडली नाही. त्यांनी मानखुर्द पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला.

Police succeeded in finding 3 girls who ran away from home mumbai police crime
Mumbai : मान्सूनकाळातही एमटीएचएलचे काम सुरळीत सुरू राहणार; खबरदारीच्या उपायांसह एमएमआरडीए सज्ज

स्थानिक पोलिसांसह, गुन्हे शाखेने देखील तपास सुरू केला.कुटुंबाकडे मुलीचा ती लहान असताना जुना फोटो होता. परिणामी नवीन फोटो नसल्यामुळे पोलिसांना तपासात अडचणींना सामना करावा लागला. पोलिसांनी बालसंगोपन संस्थांकडे तपासणी केली अशाच वर्णन असलेली एक मुलगी एका बालसंगोपन केंद्रात दाखल झाल्याचे समजले. त्वरित पोलिसांनी मुलीला शोधून काढली आणि तिच्या आईला मामाला व्हिडिओ कॉल केला, ज्याने मुलीला ओळखले. बुधवारी या मुलीची तिच्या कुटुंबीयांशी भेट झाली

Police succeeded in finding 3 girls who ran away from home mumbai police crime
Pune Lok Sabha Election : मतदारसंघ निहाय निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर; पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुख मुरलीधर मोहोळ

दुसऱ्या घटनेत शनिवारी, अंधेरी पूर्व येथील 10 वर्षीय मुलगी सकाळी 11.30 च्या सुमारास तिच्या आईसोबत भांडण झाल्यावर घरातून निघून गेली. “मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच पालकांनी प्रथम तिला परिसरातील मित्रांच्या घरी, घरापासून जवळ असलेली तिची शाळा आणि इतर संभाव्य ठिकाणी शोध घेतला. देवघरातील ठेवलेली रक्कम घेउन मुलगी घर सोडून गेली होती. त्यानंतर, त्यांनी दुपारी 4.30 च्या सुमारास पोलिसांशी संपर्क साधला. अंधेरी पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली आणि दहा टीम तयार केल्या.

Police succeeded in finding 3 girls who ran away from home mumbai police crime
Good Health : तरुणांनो, सुदृढ रहायचेय, तर तृणधान्ये खा - मानखेडकर

पोलिसांनी तिच्या हालचालींचा मागोवा घ्यायला सुरुवात केली . बेपत्ता मुलगी प्रथम तिच्या शाळेत गेली, नंतर काही सार्वजनिक ठिकाणी बसली होती. नंतर जोगेश्वरी रेल्वे स्थानकावर ती गेली आणि तिथून तिने ट्रेन ने प्रवास करत दिशेने खार स्टेशनवर उतरली.पोलिसाना सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी दिसली नाही.त्यानंतर पोलिसांनी स्टेशनवरील लोकांना विचारणा केली.

जवळपास 150 व्यक्तींशी बोलल्यानंतर, मुलीचे स्वरूप आणि पोशाख वर्णन पोलिसांनी मिळाले. त्यानुसार गोपनीय बातमीदारना आणि इतर पोलीस ठाण्यांना मुलीचे वर्णन देण्यात आले.“पोलिसाना मुलीच्या ठिकाणां संदर्भात माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचून रात्री 11 च्या सुमारास बेपत्ता मुलगी पोलिसाना सापडली. दिवस संपण्याआधीच ती तिच्या कुटुंबाशी पुन्हा जोडली गेली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.