मुंबई - पोलिसांच्या तत्परतेमुळे टॅक्सीत विसरलेली बॅग तासाभरात शोधत लाखांचा ऐवज महिलेला परत मिळवून देण्यात पोलिसांना यश मिळाले आले. मलबार हिल येथे एक महिला साडेतीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग टॅक्सीत सोमवारी विसरली होती. मलबार हिल पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तासाभरात टॅक्सीचालकाचा शोध लावून टॅक्सीत विसरलेली बॅग परत मिळवली.महिलेने या तत्परतेबद्दल पोलिसांचे आभार मानले आहे.
रुपा झवेरी या सो्मवारी सायंकाळी मलबार हिल येथून सिक्का नगरला जाण्यासाठी टँक्सीने प्रवास करत होत्या. प्रवासात त्यांनी सोन्याचे दागिने असलेली बँग स्वतःजवळ बाळगली होती. प्रवास पूर्ण करून सिक्कानगर परिसरात उतरल्यानंतर रूपा झवेरी आपली दागिन्यांची बँग टँक्सीतच विसरल्या.
टॅक्सीतून उतरल्यावर काही वेळानंतर त्यांना बॅग टॅक्सीमध्येच राहिल्याचे लक्षात आले. बॅगेत बांगड्या, पाटल्या आणि इतर दागिने असे एकूण साडे तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते. या घटनेनंतर त्यांनी मलबार हिल परिसरात टॅक्सीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रवास केलेली टॅक्सी त्यांना दिसली नाही.
अखेर रूपा यांनी जवळच्याच मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याअनुषंगाने मलबार हिल पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सायबर पथकासोबत तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध सुरू केला.त्यानुसार सायबर पथकाच्या अधिकाऱ्यानी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास करून टॅक्सीचा नोंदणी क्रमांक मिळवला.
त्या क्रमांकाच्या माध्यमातून टॅक्सीच्या मूळ मालकाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्याने तात्काळ त्याच्या चालकाला दूरध्वनी करून टॅक्सीत विसरलेल्या बॅगेबाबतची माहिती दिली.टॅक्सीचालकानेही तात्काळ महिलेची बॅग परत केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तासाभरात महिलेला तिची बॅग मिळाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.