Mumbai Police : महिलांशी चॅटिंग करून त्रास देणाऱ्यांना पोलिसांकडून कारवाईचा इशारा

महिलांना अनोळखी व्यक्तींकडून गरज नसताना मेसेज करुन नाहक त्रास देण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
Chatting
Chattingsakal
Updated on

मुंबई - महिलांना अनोळखी व्यक्तींकडून गरज नसताना मेसेज करुन नाहक त्रास देण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे महिलांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.

आता मुंबई पोलिसांनी महिलांना अनावश्यक मेसेज करून त्रास देणाऱ्या विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे.सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या अधिकृत खात्यामार्फत एक पोस्ट शेअर करून विनाकारण चॅटिंग करणाऱ्यांना इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या या पोस्टने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी एकप्रकारे जनजागृतीच केली आहे, त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या पोस्टला पाहून अंदाज लावता येऊ शकतो की, कुणालातरी मेसेज केला जात आहे, अनेकदा हाय असा मेसेज पाठवण्यात आला आहे. जबरदस्तीने मेसेज केल्याचं या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे त्या मेसेजला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला जात नाहीय. त्यानंतर शेवटी एक मेसेज पाहायला मिळतोया, यामध्ये त्या व्यक्तीने समोरच्या माणसाचा कॉन्टॅक्ट नंबर ब्लॉक केल्याचं दिसत आहे.अशा प्रकारे पोलिसांनी अतिशय समर्पक पद्धतीने संदेश देत कारवाईचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.