Mumbai : पर्यटन क्षेत्रात महिलांना संधी व रोजगार देणारे धोरण तयार

'आई' नावाने प्रस्तावित महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार
policy to provide opportunities and employment to women tourism mumbai
policy to provide opportunities and employment to women tourism mumbaisakal
Updated on

- गायत्री श्रीगोंदेकर

मुंबई : राज्यातील महिला समक्षीकरणाच्या दृष्टीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा अंतर्गत महिला केंद्रित पर्यटन धोरण “आई” या नावाने प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याच्या पर्यटन विभागाने दिली.

या धोरणांतर्गत राज्यातील महिला पर्यटकांना सुरक्षित वातावरणात बहाल करण्यासोबतच पर्यटन क्षेत्रात महिलांना रोजगाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे प्रस्तावित धोरणात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

महिलांना मिळणारे आर्थिक स्वातंत्र्य, गतिशीलता, त्यांचा उत्साह, महत्वाकांक्षा आणि निर्णयक्षमतेचा फायदा घेत राज्यात दर्जेदार पर्यटनाला चालना देणे, तसेच महिलांसाठी वैविध्यपूर्ण आणि शाश्वत आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करुन त्याद्वारे स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणे हे 'आई' या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.

तसेच, याव्दारे महिलांना सुरक्षित, परवडणारी, शाश्वत आणि समृध्द पर्यटनाची संधी उपलब्ध होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. महिला संचलित पर्यटक निवास आणि रेस्टॉरंटची सुरुवात त्यानुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील पर्यटक निवास राज्यातील प्रथम महिला संचालित पर्यटक निवास म्हणून व खारघर रेसिडेन्सीचे अर्का रेस्टॉरंट पूर्णत: महिला संचालित रेस्टॉरंट म्हणून चालविण्यात येईल.

तसेच, महामंडळामार्फत आयोजित पर्यटन सर्किट, पॅकेजेसमध्ये २०% सवलतीची रक्कम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे ऑपरेटरला दिली जाईल. याकरीता येणार सर्व खर्च महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास शासनाकडून देण्यात येईल.

एमटीडीसीच्या सर्व रिसॉर्ट्स व विभागांमध्ये महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये वर्षभरात एकूण ३० दिवस ५०% सूट देण्यात येईल. याचबरोबर, एमटीडीसी रिसॉर्ट्समध्ये हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी महिला उद्योजकांना वाजवी भाडे घेऊन स्टॉल उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहितीही पर्यटन विभागाने दिली.

वित्तपुरवठा आणि मनुष्यबळ

हे धोरण यशस्वी होण्यासाठी आणि महिलांना पर्यटन व्यवसायासाठी पुरेसा वित्तपुरवठ्याची हमी मिळावी याकरीता सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका व इतर वित्तीय संस्थांच्या सहकार्याने योजना राबिवण्यात येणार आहे. एमएसएमई वित्तपुरवठ्यासाठी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ महिला पर्यटन व्यावसायिकांना मिळवून देण्यात येईल.

महिला आर्थिक विकास महामंडळ सारख्या संस्था बरोबर भागीदारी कऱण्यात येईल. एमएसआरएलएम, मविम आणि इतर संस्थांच्या सहाय्याने स्थापन झालेल्या महिलांच्या गटांच्या सहभागाने पर्यटनस्थळी लँडस्केप डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट, वारसा स्थळे आणि नैसर्गिक स्थळे जतन करणे, रिसॉर्ट्समधील सुविधा व्यवस्थापन इत्यादी सेवांसाठी महिला नेतृत्वात उपक्रमांना प्राधान्य देण्यात येईल.

महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी टूर पॅकेजेस

- महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल.

- दिव्यांग महिलांसाठी सहल

- महिला पर्यटकांसाठी एक दिवसीय सहल

- तरुण महिलांसाठी साहसी सहली

- एकट्या महिला पर्यटकांसाठी स्थानिक स्थळदर्शन सहल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.