दिनेश गोगी
उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार भगवान भालेराव यांनी विद्यमान आमदार व भाजपा उमेदवार कुमार आयलानी यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केल्यावर पप्पू कलानी यांनी मिरची भजी चाखत आयलानी यांच्या कार्यालयावर धडक दिली.तेंव्हा दोन्ही समर्थकांनी परस्पर विरोधी घोषणाबाजी केली.आयलानी यांनी समर्थकांना शांततेचे आवाहन केल्यावर आणि कलानी समर्थकासह मागे फिरल्याने पुढील अनर्थ टळला.