डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रीपद, जाणून घ्या रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास

भाजपा आमदार रवींद्र चव्हाण कॅबिनेट मंत्री, डोंबिवलीत एकच जल्लोष
BJP MLA Ravindra Chavan
BJP MLA Ravindra Chavan

डोंबिवली - राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे आणि फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला. डोंबिवलीला पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री पद मिळाले असून भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी मंत्री पदाची शपथ घेताच डोंबिवलीत भाजपाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत फटाके फोडून, पेढे भरवित जल्लोष साजरा केला.

शिंदे व फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता लागली होती ती नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात कोणा कोणाची वर्णी लागते. शिंदे यांचे मन परिवर्तन करण्यात आणि त्यांची बंडखोरी ते मुख्यमंत्री पदाचा प्रवास यामध्ये आमदार चव्हाण यांची भूमिका महत्वाची होती. फडणवीस यांच्या जवळचे आणि राज्यात भाजपाची सत्ता आणण्यास हातभार लावणारे आमदार चव्हाण यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा पहिल्या दिवसापासून होती. अखेर मंगळवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले आणि चव्हाण यांनी मंत्री पदाची शपथ घेतली.

राज्यात शिंदे व फडणवीस सरकारला मनसे पक्षाने समर्थन दिले आहे. राज्यसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे मत भाजपासाठी मोलाचे ठरले होते. त्यांच्या या सहकार्यामुळे आमदार पाटील यांना देखील मंत्रिपद दिले जाणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सोमवारी रात्री पासूनच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल मीडियावर आमदार चव्हाण यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली होती. मंगळवारी आमदार चव्हाण यांनी शपथ घेताच डोंबिवलीत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. भाजपाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष माळी यांनी कार्यकर्त्याना तसेच परिसरात पेढे वाटून हा आनंद साजरा केला.

भाजपाचे आमदार रविंद्र चव्हाण यांना मंत्रिपद मिळाल्याने आम्ही आज दिवाळी साजरी केली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांना देखील या सरकार मध्ये मंत्रिपद मिळाल्यास आम्ही दसरा साजरी करू अशी प्रतिक्रिया यावेळी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष माळी यांनी व्यक्त केली.

आमदार चव्हाण यांचा राजकीय प्रवास

2002 साली भारतीय जनता युवा मोर्चाचे कल्याण उपजिल्हाध्यक्ष पदावर त्यांची नेमणूक झाली. तर 2005 साली डोंबिवलीतील सावरकर रोड प्रभागातून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून प्रथम निवडून आले. 2007 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदावर विराजमान झाले. नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच 2009 साली डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला. 2014 व त्यानंतर 2019 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकण पट्ट्यातील सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन डोंबिवलीकरांनी सलग तिसऱ्यांदा त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. दरम्यान, 2016 साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेऊन महाराष्ट्र सरकारच्या 4 खात्यांची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यामध्ये बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचा राज्यमंत्री म्हणून युतीच्या काळात कार्यरत होते.

भाजप शिवसेना युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आले. आमदार असतानाच, त्यांची 2020 साली भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून नेमणूक झाली. तसेच फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्री पद भूषविले आहे. 2022 मध्ये त्यांची पुन्हा एकदा शिंदे व फडणवीस सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com