Kalyan Lok Sabha : श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात नव्या युवराजाची एंट्री, भाजपच्या खेळीने समीकरणे बदलणार ?

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गणपत गायकवाड याची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती.
vaibhav ganpat gaikwad
vaibhav ganpat gaikwadesakal
Updated on

डोंबिवली - कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांची नुकतीच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वैभव हे आतापर्यंत वडिलांच्या पाठी राहून समाजकारण करत होते. पक्षाने त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी दिली असून त्यांची राजकारणात एंट्री होताच जोरदार स्वागत केले. वैभव यांच्या एट्रीने कल्याण लोकसभेतील राजकीय पटलावर अजून एक युवा नेतृत्व तयार होत आहे. कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे,

शिंदे गटातील युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे, शिंदे गटातील कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड, मनसे आमदार यांचे बंधू कल्याण ग्रामीण विधानसभा अध्यक्ष विनोद पाटील आणि यानंतर वैभव गायकवाड. या युवा नेतृत्वामुळे कल्याण लोकसभेतील राजकिय समीकरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात आणण्यासाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजित पवार गट जोरदार प्रयत्न करत आहेत. केंद्रातील सत्तेसाठी हे एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र कोणाचे वजन जास्त हे दाखवण्यासाठी पक्षांची चढाओढ दिसते. राज्यात सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ आपल्यात सगळे आलबेल असल्याचे दाखवत आहेत. मात्र स्थानिक पातळीवर पक्षातील मतभेद तसेच भाजप आणि शिंदे गटातील पदाधिकारी यांच्यात बेबनाव असल्याची बाब वारंवार निदर्शनास आली आहे.

vaibhav ganpat gaikwad
Mumbai Crime : लेडीज बारवर पोलिसांनी टाकला छापा अन्...!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याच मतदारसंघात जोरदार राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड हे कायम एकमेकांना भिडत असतात. त्यांचे समर्थक देखील यात मागे नसून ते देखील एकमेकांवर कायम वार पलटवार करताना दिसतात.

शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश यांच्या वाढदिवसाला भावी आमदार म्हणून त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली. महेश हे आमदारकीच्या तिकिटासाठी प्रयत्न करत असल्याची देखील चर्चा आहे. कल्याण पूर्वेत तीन वेळा आमदार झालेले गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव यांची आता राजकारणात एंट्री झाल्याने कल्याण पूर्वेतील भाजपचा युवा चेहरा म्हणून वैभव यांची चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या स्वागताचे बॅनर कल्याण डोंबिवली शहरात झळकवण्यात आले.

vaibhav ganpat gaikwad
Mumbai Crime : मुंबईतील ‘सिरियल रेपिस्ट’ डॉक्टराविरुद्ध पाचवा गुन्हा दाखल

शिंदे गटातील विरोधकांनी काही ठिकाणी या बॅनर वर दुसरे बॅनर लावत ते झाकल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. यावरून माझे बॅनर आत्ताच झाकण्याची वेळ येत असेल तर मला माझे काम योग्य पध्दतीने सुरू आहे असे वाटते. मी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन काम करण्यास इच्छुक आहे असे वैभव यांनी सांगितले आहे.

दरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड हे तीनदा निवडून आले, तेव्हा वैभव प्रत्यक्ष राजकारणात नव्हते. बॅकहॅन्ड वडिलांचे काम पाहत होते. तर आता त्यांची राजकारणात एन्ट्री झाल्याने आमदार गायकवाड हे बॅकहॅन्ड राहून वैभव यांना भावी आमदारसाठी तयार करु शकतात असे जाणकार सांगतात.

याबाबत वैभव यांना विचारले असतात ते म्हणाले, चांगल्या राजकारणाची सुरवात व्हावी म्हणून मी राजकारणात आलो आहे. चेन्ज द सिस्टीम, आय एम सिस्टम त्याच गोष्टीसाठी मी आलो आहे. असे वैभव यांनी सांगितले. माझ्या बॅनरवर काही लोकांनी बॅनर लावले झाकण्यासाठी, मी समजून गेलो माजी सुरवात झाली, मी वाद नाही करणार. बॅनर काढतील पण लोकांच्या मनातून मला कोणी काढू शकत नाही. असा टोलाही विरोधकांना त्यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.