Election campaign strategies 2024: राज्यभरात बुधवारी झालेल्या निवडणुकीनंतर आता शनिवारी लागणाऱ्या निकालापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एक्झिट पोलमध्ये महायुती किंवा महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर आतापासूनच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. एका मोठ्या पक्षाने दोन विमाने आणि हेलिकॉप्टर बूक करून ठेवल्याची माहिती समोर येत आहे.