मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला. यावेळच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच उद्घव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या मंत्र्यांना यंदा घाम फुटला आहे. सध्या तरी दहा मंत्र्यांच्या मतदारसंघात अटीतटीचा सामना आहे.