Pollution News: मुंबईकरांनो काळजी घ्या; इतक्या अंकांनी वाढले मुंबईचे प्रदूषण

air pollution
air pollutionesakal
Updated on

Pollution News: शहरात आठवडाभरापासून सुधारलेला हवेचा दर्जा पुन्हा खालावला आहे. हवेच्या प्रदूषणात पुन्हा वाढ होऊ लागल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. बुधवारी दिवसभर हवेत आर्द्रता होती. दुपारी घामाच्या धारा वाहत होत्या. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशाक (एक्यूआ) १३८ (मध्यम) नोंदवला गेला. कुलाबा विभागात एक्यूआय २४२ म्हणजेच वाईट नोंदवला गेला आहे.

वातावरणात झालेल्या बदलामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक खालावत आहे. सकाळी वातावरणात गारवा जाणवतो. या कालावधीत सरासरी २२ डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे; मात्र हवेत पसरलेल्या धूलिकणांमुळे नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार बळावले असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खराब हवेमुळे मॉर्निंग वॉकला बाहेर न पडण्याचाही डॉक्टरांकडून सल्ला दिला जात आहे.

air pollution
Nagpur Water Pollution: अर्ध्या नागपूरचे आरोग्य धोक्यात ! कन्हान नदी सर्वाधिक प्रदूषित, पाणी पिणे अपायकारक

सर्दी-खोकला बळावला

सर्दी-खोकला, डोळ्यांची जळजळ आणि पाणी येणे, धाप लागणे तसेच घसा खवखवणे अशा विविध कारणांनी नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे ४० टक्के नागरिकांनी सकाळी फेरफटका मारणेही तात्पुरते बंद केले आहे. मुंबईपेक्षा उपनगरांतील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांत पीएम १० ची मात्रा अधिक आहे. यासाठी रस्त्यांवरील धूळ, बांधकामांतून उडणारे धूलिकण, औद्योगिक उत्सर्जन, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण कारणीभूत ठरत आहे.

मुंबई व लगतच्या शहरात १६ लाखांहून अधिक वाहने आहेत. त्यातून होणाऱ्या उत्सर्जनामुळे तसेच औद्योगिक झोनमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे अस्थमा, ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया, फुप्फुस कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, क्रॉनिक ऑब्स्टर्क्टिव्ह पल्मोनरी डिसऑर्डर आणि इतर दम्याचे आजार वाढू लागले आहेत. वायुप्रदूषणामुळे भयानक परिस्थिती उद्‍भवू शकते. अशुद्ध व प्रदूषित हवेमुळे श्वसनविषयक आजार तिपटीने वाढू शकतात. वायुप्रदूषणामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत वातावरण दूषित राहते. त्यामुळे अस्थमा, हृदयविकार, रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांनी मॉर्निंग वॉक टाळणे जरुरीचे आहे.’

- डॉ. पार्थिव शहा, फुप्फुस विकारतज्ज्ञ, अपेक्स रुग्णालय समूह, बोरिवली

air pollution
Nagpur Pollution news : कन्हान नदी सर्वाधिक प्रदूषित, अर्ध्या नागपूरचे आरोग्य धोक्यात

हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय)

मुंबई : १३८ मध्यम

भांडुप : १२४ मध्यम

कुलाबा : २४२ वाईट

मालाड : १५७ मध्यम

माझगाव : १४४ मध्यम

वरळी : ९८ समाधानकारक

बोरिवली : १५९ मध्यम

बीकेसी : १२३ मध्यम

चेंबूर : १७७ मध्यम

अंधेरी : ११६ मध्यम

नवी मुंबई : १२१ मध्यम

air pollution
National Pollution Control Day 2023: घरातही असते दुषित हवा, हे उपाय करा अन् घरातही घ्या मोकळा श्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.