मुंबई - मानखुर्दच्या पी एम जी पी वसाहत परिसरातील नागरिकांना खडीची भेसळ केलेले धान्य रेशन दुकानावरून वितरीत केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गुरुवारी (ता. १६) सकाळी या परिसरातील नागरिकांनी रेशन दुकानावरून आणलेल्या गव्हामध्ये बांधकामामध्ये वापरण्यात येणारी खडी आढळून आली. एकीकडे संचारबंदीमुळे बेरोजगारीची भीती सतावत आहे तर दुसरीकडे कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे आवाहन सरकार करत आहे. या परिस्थितीत हे भेसळीचे धान्य खाऊन रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढणार, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागू झाली. त्यामुळे कित्येकांचा रोजगार बुडाला व उपासमारीची वेळ आली. रेशनवर स्वस्तात उपलब्ध असलेल्या धान्यामुळे काही अंशी ही समस्या मार्गी लागली आहे. रेशनवर मिळणाऱ्या धान्यामध्ये कचरा व खडे असतातच, त्यामुळे हे धान्य निवडून मगच खाण्याची सवय गरिबांच्या अंगवळणी पडली आहे.
स्वस्तात मिळत असल्यामुळे कोणतीही तक्रार न करता भेसळयुक्त धान्य ते नेहमी खातात. कोरोनामुळे भीतीच्या वातावरणात जगत असलेल्या या नागरिकांच्या नशिबाचे भोग काही संपताना दिसत नाहीत. आजवर धान्यातून खडे काढून खाणारयांच्या धान्यात चक्क बांधकामात वापरली जाणारी खडी आढळली आहे.
खडी मिसळून मापात पाप केली जात असून त्यामुळे वाट्याला कमी धान्य येत आहे. आधीच हाताला काम नाही त्यामुळे जास्तीत जास्त दिवस धान्य पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.त्यात आणखी धान्य कमी मिळाल्यावर कसे जगायचे हा प्रश्न त्यांना पडत आहे. या प्रकारामुळ गरिबांच्या गरिबीची थट्टा केली जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
poor people are getting wheat with construction stones read fill story about rationing scam
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.