मुंबई : बांधकामासाठी लागणार सिमेंट आणि स्टीलच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. परिणामी घरांच्या किंमती देखील वाढल्या असून बांधकाम उद्योगाला फटका बसू लागला. आता यातून सावरण्यासाठी सिमेंट आणि स्टील या सारख्या कच्च्या मालाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने केली आहे. या मागणीसाठी शुक्रवारी दिवसभर देशातील बांधकामे एक दिवस बंद ठेवण्यात आली.
कोरोना काळात देशातील बांधकाम व्यवसायावर मोठा परिणाम झाला. बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने काही सवलती जाहीर केल्या. यामुळे बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. परंतु बांधकामासाठी लागणारा सिमेंट आणि स्टील हा कच्चा माल सतत महाग होत आहे. याचे दर वाढत असल्याने बांधकाम क्षेत्राचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. यामुळे सिमेंट आणि स्टीलच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने प्राधिकरण निर्माण करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष्य केंद्रात करण्यासाठी बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाने एक दिवसाचे काम बंद आंदोलन केले.
बांधकाम क्षेत्रातील कच्चा मालाच्या किंमती वाढल्या आहेत. याबाबत बजेट मध्ये मात्र काही दिलासा मिळालेला नाही. आता मोठया प्रमाणावर कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे कच्चा मालाची म्हणजे स्टील आणि सिमेंटची मागणी मोठी वाढली आहे. त्यामुळे जेव्हा उत्त्पादन वाढेल तेव्हा त्याच्या किंमती निश्चितच पुढील दोन ते तीन महिन्यांत खाली येतील, असा विश्वास विकासकांना आहे.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे मुंबई विभागाचे प्रवक्ते आनंद गुप्ता यांनी सांगितले की, सिमेंट आणि स्टीलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. या किंमती नियंत्रित राहिल्या पाहिजेत किंवा कमी झाल्या पाहिजेत याबाबतची कारवाई करण्यासाठी सिमेंट आणि स्टील नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे. या मागणीसाठी आज प्रतिनिधीक काम बंद आंदोलन केले आहे. सरकारने याची दखल न घेतल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
Possibility of delay in possession of your dream home developers warned of intense agitation
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.