Mumbai Crime News: मुंबईत बॉम्बस्फोट होण्याची शक्यता, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हा फोन आला होता. पोलिसांनी या आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये धमकीचे फोन वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याची शक्यता असल्याचे सांगत त्या व्यक्तीने सांगितले आहे. एकच वाक्य बोलून त्याने लगेचच फोन कट केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

काल (शनिवारी) सायंकाळी ६ च्या सुमारास हा फोन आला होता. पोलिसांनी या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. प्राथमिक तपासात फोन जे बी नगर एअरपोर्ट रेसिडन्सी कॉम्पलेक्समधून फोनचे लोकशन समजले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Mumbai Crime News
Mumbai: ३१ डिसेंबर निमित्त मुंबई पोलिसांनी महत्वाचे आदेश केले जारी!

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी ६.३० च्या सुमारास मुंबई पोलीस नियंत्रणाला धमकीचा फोन आला, ज्यामध्ये कॉलरने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला आणि असे सांगितल्यावर कॉल डिस्कनेक्ट केला. पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास सुरू केला आहे, मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. पोलिस सध्या कॉलरचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.