सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, शिवसैनिकांना ओपन चॅलेंज

आम्ही तुमची वाट बघतोय, नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज
सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका, शिवसैनिकांना ओपन चॅलेंज
Updated on

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे मुंबई आणि कोकणात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यानंतर युवा सेना आक्रमक झाली आहे. सर्व युवा सैनिकांना जुहू येथे जमण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळेच मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी तसे ट्विट केले आहे.

माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी थेट शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

काय म्हणाले होते राणे?

राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे विचारावे लागते. मी तिथे असतो तर कानाखालीच वाजवली असती,’’ असे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. जन आशीर्वाद यात्रेनिमित्त राणे यांनी महाडमधील पूरग्रस्तांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की प्रगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी असा मुख्यमंत्री असणे ही महाराष्ट्राची अधोगती आहे. कोणत्याही विषयाचे ज्ञान त्यांना नाही. आपल्याला माहीत नसेल तर सचिवाला विचारावे. त्यादिवशी स्वातंत्र्याचा हीरक महोत्सव आहे काय, असे त्यांनी कोणाला तरी विचारले. देशाचा कितवा स्वातंत्र्यदिन आहे, हे त्यांना माहीत नाही. माझ्यासारखा तिथे असता तर कानाखालीच वाजवली असती. बाळासाहेबांच्या आदर्शाला तिलांजली देऊन गद्दारी करीत ते मुख्यमंत्री झाल्याची टीकाही राणे यांनी केली. पूरग्रस्तांबाबत राज्य सरकार योग्य मदतकार्य करत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नेमकं काय झालं होतं? -

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला होता. यावेळी त्यांच्यामागे उभे असलेले मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.