Mumbai Crime : पवई एअरहोस्टेस हत्या प्रकरण तपासात नवी माहिती आली समोर

मुंबईत रुपल ओग्रे या एअरहोस्टेची हत्या प्रकरणात पोलिसांनी हत्येसाठी आरोपीने वापरलेला चाकू आणि आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे पुरावे म्हणून ताब्यात घेतले आहेत.
Crime
Crimesakal
Updated on

मुंबई - मुंबईत रुपल ओग्रे या एअरहोस्टेची हत्या प्रकरणात पोलिसांनी हत्येसाठी आरोपीने वापरलेला चाकू आणि आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे पुरावे म्हणून ताब्यात घेतले आहेत. रुपलच्या राहत्या इमारतीत हाऊकिपिंगचं काम करणाऱ्या विक्रम अटवालने 4 सप्टेंबर रोजी रूपलची गळा चिरून हत्या केली होती.

आरोपीच्या चौकशीत आरोपी रुपलचा बलात्कार करायच्या उद्देशाने तिच्या घरात गेल्याचे पोलिसांसमोर कबूल केले आहे. यासोबतच आरोपी अटवाल आणि पीडित रूपल यामध्ये बरेच वेळा शाब्दिक वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विक्रम अटवाल हा पवईमध्ये त्याच्या पत्नी दोन मुलींसह वास्तव्यास आहे.

पुराव्यांची जुळवाजुळव

एअरहोस्टेस रूपल ओग्रेची हत्या करण्यापूर्वी 3 दिवस आधी विक्रमने हत्येसाठी वापरलेला चाकू विकत घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या अनुषंगाने पोलीस आरोपीची चौकशी करत असल्याची माहिती मिळत आहेत. आरोपी विक्रमने हत्येसाठी वापरलेला नऊ इंचाचा धारदार चाकू आणि विक्रमने घातलेले कपडे दोन्ही जप्त केलं आहे.

पोलिसांनी हे दोन्ही पुरावे फॉरेन्सिक चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. यासोबतच आरोपी अटवाल आणि पीडित रूपल यामध्ये शुक्रवारी आणि रविवारी सकाळी शाब्दिक वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे.

बलात्काराचा उद्देश

आरोपी विक्रम अटवालशी पोलिसांनी केलेल्या चौकशीत रुपलवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने घरात शिरल्याची विक्रमने पोलिसांसमोर कबूली दिल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने घरात शिरताना आपल्या कपड्यात सुरा लपवला होता. पीडितेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तो घरात घुसला. पण रूपलने प्रतिकार केल्याने त्याने घाबरून तिची हत्या केली. दरम्यान, पीडितेनं आरोपीच्या चेहऱ्यावर आणि मानेवर ओरखडे ओढले.

घटनाक्रम

मरोळ परिसरातील के. मारवाह मार्गावरील एन.जी. कॉम्प्लेक्स सोसायटीतील रूपल ओग्रे ही वात्वयास होती. रूपल एअर होस्टेस म्हणून कार्यरत होती. मुळची छत्तीसगडची रहिवासी असलेली रुपल एप्रिल 2023 मध्ये नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली होती. रुपल ओग्रे फ्लॅटमध्ये तिची बहीण आणि बहिणीच्या प्रियकरासह राहात होती. परंतु, रूपलची बहिण आणि तिचा प्रियकर दोघेही आठ दिवसांपूर्वी रायपूरला गेले होते.

रविवारी तिचे कुटुंबीय दूरध्ववनीवरून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र ती उत्तर देत नव्हती. कुटुंबीयांनी तिच्या काही मित्रांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तिचे मित्र सोसायटीतील रुपलच्या घरी गेले. मात्र घराचा दरवाजा आतून बंद होता. घरातून कोणीच प्रतिसाद देत नव्हते. अखेर पोलिसांना बोलावण्यात आले, पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी रुपल घरामध्ये मृतावस्थेत आढळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.