पवईत मुख्याध्यापिकेने मुलांच्या फी साठी जमवले ४० लाख रुपये

या पैशातून इतक्या मुलांची फी भरण्यात आली.
पवईत मुख्याध्यापिकेने मुलांच्या फी साठी जमवले ४० लाख रुपये
Updated on

मुंबई: पवईत एका शाळेच्या (Powai principal) मुख्याध्यापिकेने खूपच कौतुकास्पद आणि इतरांसाठी आदर्श ठरेल, असं काम केलं आहे. सध्या लॉकडाउनमुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या (parents job) गेल्या आहेत. काहींची वेतन कपात झाली आहे. त्यामुळे अनेक पालकांना आपल्या पाल्याची फी भरताना अडचणींचा सामना करावा लागतोय. या कठीण काळात विद्यार्थ्यांचं भविष्य आणि शैक्षणिक हित लक्षात घेऊन शर्ली पिल्लई (Shirley Pillai) या मुख्याध्यापिकेने क्राऊडफंडिंगच्या (crowdfunding) माध्यमातून तब्बल ४० लाख रुपये उभे केले. (Powai principal Shirley Pillai collects Rs 40L from donors to pay students fees)

उद्योजक आणि काही व्यक्तींनी देणगी म्हणून ही रक्कम दिली. शर्ली पिल्लई या पवई इंग्लिश हाय स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत. मार्च २०२० मध्ये लॉकडाउन लागल्यापासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. "माझ्या ३५ वर्षाच्या शिक्षकी पेशामध्ये मी पहिल्यांदा पाहिलं की, मुलांचे रिपोर्ट कार्ड्स माझ्या टेबलावर पडून होते. पालक शाळेमध्ये यायचं टाळत होते" असे पिल्लई यांनी सांगितलं.

पवईत मुख्याध्यापिकेने मुलांच्या फी साठी जमवले ४० लाख रुपये
मुंबई अनलॉक करण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात...

"२,२०० पैकी फक्त ५० टक्के विद्यार्थ्यांनी त्यांची फी पूर्ण भरली होती. शिक्षक जेव्हा पालकांपर्यंत पोहोचले, तेव्हा पालकांचा कोरोनामुळे स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष सुरु असल्याचं त्यांच्या लक्षात आलं" असे शर्ली म्हणाल्या. "रोजंदारीवर काम करणाऱ्या मुल, कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं आमच्या शाळेत शिक्षण घेतात. अशा परिस्थितीत सर्वात आधी मुलींना शाळा सोडायला भाग पाडलं जातं, त्याची भीती होती" असे शर्ली पिल्लई म्हणाल्या.

पवईत मुख्याध्यापिकेने मुलांच्या फी साठी जमवले ४० लाख रुपये
राज ठाकरेंचा विद्यार्थी धर्म! शिक्षिकेला दिला मदतीचा हात

"शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी वार्षिक फी मध्ये २५ टक्के सवलत देण्यात आली. शिक्षक आणि बिगर शिक्षक अशा १०५ जणांच्या कर्मचारीवर्गाने ३० ते ५० टक्के वेतन कपातीचा निर्णय स्वीकारला. पण त्यानेही काही होत नाहीय, हे लक्षात आल्यावर पवईतील उद्योजक आणि काही व्यक्तींना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले" असे पिल्लई यांनी सांगितले. "मला आनंद होत आहे की, ४० लाख रुपयांची जी रक्कम जमा झाली, त्यातून २०० विद्यार्थ्यांची फी भरण्यात आली" असे शर्ली यांनी सांगितले. आता २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी त्या प्रायोजक शोधत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.