मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत देशभरातील उद्योगधंदे बंद पडले होते. मात्र, लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत असताना मुंबईसह राज्यातील उद्योगधंदे अटी आणि शर्थींसह सुरु करण्यात आले होते. अशाचप्रकारे लॉकडाऊन भिवंडीतील अनेक पॉवरलूमचे काम बंद पडले होते. तेथील अनेक कामगार गावीही गेले होते. मात्र आता काही अटींवर या लूम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता कामगारही परतल्यामुळे काही लूममध्ये दोन शिफ्टमध्ये काम सुरु झाले आहे.
अनलॉक सुरु झाल्यावर तसेच पॉवर लूम सुरु होण्याची परवानगी मिळाल्यावर तिथे 25 ते 30 टक्के काम सुरु झाले होते. मात्र आता कामाचे तास वाढले आहेत. मुंबईतील कापड मार्केट सुरु झाले, त्यांनी भिवंडीतील या गिरण्यातून कापड खरेदी सुरु केल्यावर येथील गिरण्यातील कामाला वेग येईल, अशी अपेक्षा बाळगून असल्याचे वृत्त आहे.
जब्बार कम्पाऊंड, फैजान कम्पाऊंड, भंडारी कम्पाऊंड, नालापार इलाका, खाडीपार, चाविंद्रा, सावंदे, सोनाले भागातील लूममध्ये दोन शिफ्टमध्ये काम सुरु झाले आहे. मोहरमनंतर बहुतेक सर्व कामगार गावाहून परततील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भिवंडी तसेच परिसरात सुमारे सात लाख पॉवरलूम आहेत. त्याचबरोबर त्यावर अवलंबून असलेले अनेक छोटे मोठे उद्योग आहेत. या ठिकाणी देशातील सर्व राज्यातील कामगार काम करतात. आता या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था असलेल्या खानावळी बंद झाल्यानेही अनेक कामगार घरी परतले होते.
आता परत आलेल्या कामगारांची कोरोना चाचणी करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी भिवंडी महापालिकेने लूममध्ये जाऊन चाचणी करावी, अशीही सूचना केली जात आहे. लूममध्ये काम सुरु असले तरी प्रशासकीय काम ऑनलाईनच सुरु आहे.
---
संपादन ः ऋषिराज तायडे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.