Eknath Shinde: "मोदींच्या कामात प्रभू राम अन् बाबासाहेबांचं संविधान"; मुंबईत आलेल्या पंतप्रधानांचं CM शिंदेंकडून कौतुक

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले.
Narendra Modi and Eknath Shinde
Narendra Modi and Eknath Shindesakal
Updated on

मुंबई : तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मुंबईत दाखल झाले. गोरेगाव मुलुंड लिंक रोड तसंच २९ हजार कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्याबद्दल त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'मोदींच्या कामात प्रभू राम आणि बाबासाहेबांचं संविधान' असल्याचं ते यावेळ म्हणाले. (Prabhu Ram and Babasaheb Ambedkar Constitution is in Narendra Modi work says CM Eknath Shinde)

Narendra Modi and Eknath Shinde
Cow Milk Rate Hike: गायीचं दूध महागलं! दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ

CM शिंदे म्हणाले, पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच मोदी मुंबईत आले आहेत. महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेच्यावतीनं मी त्यांचं स्वागत करतो. पंतप्रधान मोदी हॅटट्रिक करणारे सर्वात यशस्वी व लोकप्रिय ठरलेले आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वात भारतानं अभूतपूर्व प्रगती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश दुप्पट गतीनं वाटचाल करेल, अशा शुभेच्छा देतो. रशियाच्या सर्वोच्च पुरस्कारानं तुम्हाला गौरविलं आहे, त्याबाबत अभिनंदन करतो. तुमच्यामुळं देशाचा गौरव जगभरात होत आहे.

Narendra Modi and Eknath Shinde
CISF Personnel Slapped: "एक रात्र थांबवण्याचं काय...."; एअरपोर्टवर पोलिसाला थोबाडीत देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यानं सांगितली आपबिती

लोकसभा निवडणुकीत पूर्ण देशात प्रधानमंत्रीपदासाठी एकच नाव होतं ते नरेंद्र मोदींचं होतं. विरोधकांनी फेक नरेटीव्ह पसरवत एकत्र येत जे जे शक्य होईल ते केलं. संविधान बदलणार, असं बोलले, पण असत्याचं आयुष्य कमी असतं. विरोधकांनी पराभूत होण्याची हॅट्रिक केली आणि काय तर पेढे वाटले. पण १०० जागा तुम्ही जिंकू शकला नाहीत आणि पेढे कसले वाटता? असा खोचक टोला यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला लगावला.

Narendra Modi and Eknath Shinde
ByPoll Result 2024: लोकसभेनंतर पोटनिवडणुकांमध्येही इंडिया आघाडीचा मोठा विजय; 13 पैकी १० जागा जिंकल्या

मोदीजी आपल्या कामात प्रभू राम आहेत. आपल्यासोबत बाबासाहेबांचं संविधान आहे. एनर्जी, कमिटमेंट यांचा एकच अर्थ आहे, मोदीजी. महायुती सरकारनं दोन वर्षांत जे पायाभूत सुविधांचे जाळं विणलं ते केवळ नरेंद्र मोदींच्या पाठबळामुळेच. त्यामुळं मोदी हे गतिशक्तीचे हे प्रतीक आहेत. ठाणे-बोरिवली हा प्रकल्प माझ्या मनात अनेक वर्षांपासून होता. याचं आज भूमिपूजन होतंय या प्रवासासाठी दोन ते अडीच तास लागतात, तो प्रवास आता १२ मिनिटांत होणार आहे. नरेंद्र मोदींच्या हाताला परिस लागला आहे. त्यांचा हात ज्या कामाला लागतो, त्याचं सोनं होतं, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.