त्या दिवशी प्रदीप भिडे यांच्या निवेदनाने अख्ख्या महाराष्ट्राला रडवलेलं

pradeep bhide
pradeep bhideesakal
Updated on

मुंबई : डीडी सह्याद्रीवरील सुप्रसिध्द वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे निधन झाले आहे. भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झाल्याची माहिती डीडी सह्याद्रीकडून ट्विटरवर देण्यात आली आहे. ते ६५ वर्षांचे होते. (Pradeep Bhide)

प्रदीप भिडे यांची आंबेगाव (जि. पुणे) तालुक्यातल्या धामणी गावात जडणघडण झाली.शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजमध्ये झालं. पुढे रानडे इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी सुरवातीला ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९७४ साली ते दूरदर्शनमध्ये आले.

दूरदर्शनवर त्यांची सुरुवात ‘प्रशिक्षणार्थी निर्मिती साहाय्यक’ म्हणून झाली. हे काम करत असतानाच्या काळात मुंबई दूरदर्शन केंद्राचे तेव्हाचे संचालक शास्त्री यांनी त्यांचा आवाज ऐकून तू बातम्या का वाचत नाही? अशी विचारणा केली. भिडे यांच्यासाठी ती सुवर्णसंधी होती. त्यांनी त्याचं सोनं केलं. ते एकेठिकाणी सांगतात, "दूरदर्शनच्या ‘वृत्तनिवेदक’ पदासाठी रीतसर ‘ऑडिशन’ दिली आणि या पदासाठी माझी निवड झाली."

शांत धीरगंभीर आवाज ही प्रदीप भिडे यांची खासियत होती. भाषेवर प्रचंड प्रभुत्व होतं. तर निवेदनात आत्मविश्वास होता. सह्याद्री वाहिनीवर संध्याकाळी सातच्या बातम्यांच्या निवेदनाच्या वेळी त्यांनी "आजच्या ठळक बातम्या" अशी केलेली दमदार घोषणा अनेकांना आठवत असेल.

pradeep bhide
दूरदर्शनचा चेहरा हरपला, ज्येष्ठ वृत्तनिवेदन प्रदीप भिडे यांचं निधन

राजीव गांधीत्यांनी तब्बल २५ वर्ष वृत्तनिवेदन केलं. याकाळात त्यांच्यावर अनेक कसोटीचे प्रसंग देखील . त्यातील सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे २१ मे १९९१. त्यादिवशी श्रीपेरूंबदूर येथे भारताचे माजी पंतप्रधान ‘राजीव गांधी यांची हत्त्या झाली. प्रसंग बाका होता. दूरदर्शनच्या केंद्रावर बातमी देण्यासाठी कोणीही नव्हतं. वृत्त संपादिका विजया जोशी यांनी भिडे यांना ‘असशील तसा त्वरीत निघून ये’, म्हणून सांगितलं.

राजीव गांधींच्या हत्येच्या बातमीमुळे मुंबईत वातावरण पेटलं होतं. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत उसळलेल्या दंगलीप्रमाणे घटना होण्याची शक्यता होती. सर्वत्र पोलीस बंदोबस्त होता. भल्या पहाटे पोलिसांच्या जीपने भिडे दूरदर्शन केंद्रावर आले. सकाळचे ६.३० वाजले होते. भिडेंनी अगदी तटस्थपणे राजीव गांधींच्या मृत्यूची बातमी वाचली पण त्यांच्या आवाजाला त्या दिवशीएक कारूण्याची झालर होती.

अनघा दिघे यांनी एका वेबसाईटची घेतलेल्या मुलाखती मध्ये ते सांगतात ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’, अशा प्रतिक्रिया त्यांना बातमी झाल्या झाल्या मिळाल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेकांचे डोळे पाणावले होते.

pradeep bhide
राजीव गांधी हत्या ! दोषीने तुरुंगात अभ्यास करून जिंकले होते सुवर्णपदक

१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोटांची मोठी मालिका झाली होती. बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. अनेक अफवा पसरत होत्या. नेमकं काय घडलं होतं याबद्दल कोणालाच काही कळत नव्हतं. त्या दिवशी संध्याकाळच्या बातम्या देण्याची जबाबदारी प्रदीप भिडे यांच्याकडे होती. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून ते दुपारी दीड वाजताच निघाले. रेल्वेने, पायी पायी असा प्रवास (अंधेरी ते वरळी) त्यांनी केला व सायंकाळी ५ वाजता पोहोचले. बातमी परिणामकारक रित्या सादर केली. आजही त्यांनी केलेलं वृत्तनिवेदन अनेकांना आठवत राहतं.

दुरदर्शनचा चेहरा ठरलेले प्रसिध्द वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे दिर्घ अजारानंतर आज निधन झाले आहे. या बातमीनंतर माध्यम क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या खास आवाजामुळे भिडे हे दुरदर्शनची ओळख बनले होते. आपल्या आवाजाच्या जोरावर महाराष्ट्रातील घराघरात पोहचण्याची किमया त्यांनी साधली होती.

image-fallback
१९९३ च्या हादरवून टाकणाऱ्या बॉम्बब्लास्ट ची २७ वर्षे.!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.