चित्रपट निर्माते प्रदीप गुहा कालवश!

कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
pradeep guha
pradeep guhasakal media
Updated on

मुंबई : चित्रपट निर्माते (film producer) प्रदीप गुहा (pradeep guha) यांचे आज अंधेरीतील (andheri) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात (kokilaben hospital) निधन (death) झाले. ते यकृताच्या कर्करोगाने (liver cancer) ग्रस्त होते. ते कर्करोगाच्या चौथ्या स्टेजचे  रुग्ण होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. मात्र  त्यांची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून अधिकच खालावत होती. शुक्रवारी त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.  

pradeep guha
म्हाडा, एमआयजीच्या वादात महापालिकेची उडी; जाणून घ्या प्रकरण

सन 2000 मध्ये आलेल्या हृतीक रोशन आणि करिश्मा कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या फिजा या चित्रपटाची तसेच मिथुन चक्रवर्ती आणि डिंपल कपाडिया यांची प्रमुख भूमिका असलेल्या फिर कभी या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली होती. गुहा यांच्या उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध स्लोन केटरिंग कॅन्सर हॉस्पिटलचा सल्ला घेत होते. गेल्या अनेक दिवसांपासून सतत बिघडत चाललेल्या प्रकृतीमुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. गृहा यांच्या निधनाबद्दल निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेता मनोज वाजपेयी, गायक व संगीतकार अदनान सामी यांच्यासहीत अन्य कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.