Prakash Ambedkar: मनोज जरांगेंना प्रकाश आंबेडकरांचा महत्वाचा सल्ला; म्हणाले, जोपर्यंत निजामी मराठा...

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या बराच चर्चेत आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
Updated on

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या बराच चर्चेत आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. पण मराठा समाजाला आरक्षण मिळेल की नाही अशी अशा चर्चा सुरु असताना वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. संविधानदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवाजी पार्क इथं संविधान सन्मान सभेत ते बोलत होते. (Prakash Ambedkar gives suggetion to Manoj Jarane at Shivaji Park in Samvidhan Sanman Sabha)

Prakash Ambedkar
Aditya L1: सूर्याच्या अभ्यासासाठी निघालेलं आदित्य L1 यान अंतिम टप्प्यात, लवकरच...; इस्रो प्रमुखांची महत्वाची माहिती

आरएसएस ओबीसींचं कधीच भलं करणार नाही

आंबेडकर म्हणाले, "मंडल आयोगानं दिलेल्या आरक्षणासाठी आम्ही लढा लढत होतो त्यावेळी काही ओबीसी मंडळी सोबत होती पण त्याला आरएसएसनं विरोध केला होता. आरएसएस कधीच ओबीसींचं भलं करणार नाही. तसेच जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत रयतच्या मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, एवढंच मी जरांगे पाटील यांना सांगतो" (Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Modi Tejas: ढगात कुणाला टाटा...? मोदींच्या तेजस उड्डाणावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हिंदूराष्ट्र झाल्यास वाद थांबतील का?

भाजपच्या नेत्यांकडून आणि त्यांच्या मातृसंस्था अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वारंवार हिंदूराष्ट्र निर्मितीचा दावा केला जातो. पण उद्या जर हिंदूराष्ट्र खरंच तयार केलं तर वाद होणार की नाहीत यावर भाजप आणि आरएसएसनं आमच्यासोबत चर्चा करावी. (Marathi Tajya Batmya)

Prakash Ambedkar
Explainer: उत्तरकाशीच्या बोगद्यात 41 कामगार नेमके कुठे अडकलेत? त्यांना बाहेर काढायला वेळ का लागतोय?

संविधान बदलण्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत कळीचा ठरणार

दरम्यान, देशाला स्वतंत्र होऊन 70 वर्षे झाली तरी आगामी लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत कळीचा ठरणार असल्याचंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. पण जे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत त्यांना एवढंच विचारतो की संविधानच बदलत आहे.

संविधान राज्य चालण्याची व्यवस्था आहे, हे ही मान्य की ती जुनी झाली असेल पण तुमच्याकडं नवीन व्यवस्था काय आहे ते तर सांगा? लोकशाही ऐवजी तुम्ही ठोकशाही आणणार आहात का? असा सवालही यावेळी आंबेडकर यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.