Prakash Ambedkar : हेमंत करकरेंवर गोळ्या झाडल्या कोणी? ; प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना सवाल

‘‘मुंबईवर २६/११ला जो हल्ला झाला, त्यात ज्या गोळ्या पोलिस अधिकारी हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरात मिळाल्या, त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नसतील, तर तो तिसरा कोण आहे, हा प्रश्‍न वरिष्ठ वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता,’
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

मुंबई : ‘‘मुंबईवर २६/११ला जो हल्ला झाला, त्यात ज्या गोळ्या पोलिस अधिकारी हेमंत करकरे आणि साळसकर यांच्या शरीरात मिळाल्या, त्या जर कसाब आणि अबू इस्माईल यांच्या बंदुकीतील नसतील, तर तो तिसरा कोण आहे, हा प्रश्‍न वरिष्ठ वकील म्हणून उज्ज्वल निकम यांना पडलाच पाहिजे होता,’’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले की, उज्ज्वल निकम यांना माझे दोन प्रश्न आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांनी उत्तर द्यावे, असे त्यांना आव्हान आहे. मुंबईवर हल्ला झाला ते खरे आहे. त्याला पाकिस्तानने रसद पुरवली याबाबत दुमत नाही. पण या घटनेच्याआड कोणीतरी दुसरी घटना घडवून आणलीय का, याचा खुलासा निकम यांनी करावा. पोलिस अधिकाऱ्यांवर झाडलेल्या गोळ्या ज्यावेळी जुळल्या झाल्या नाहीत, तेव्हा त्या कोणत्या शस्त्रातील होत्या? याबाबत त्यांनी अतिरिक्त चौकशी का केली नाही. न्यायालयाच्या नजरेस त्यांनी ही बाब का आणून दिली नाही, याचा खुलासा निकम करतील अशी अपेक्षा करतो.

Prakash Ambedkar
Loksabha Election : भाजपचा बालेकिल्ला भेदण्याचे ‘मविआ’समोर आव्हान

चौकशी का केली नाही’

‘‘माझे पुतळे कोणाला जाळायचे असतील त्यांनी जाळावेत. देशद्रोही घोषित करावे, मला फरक पडत नाही. पण पोलिस अधिकाऱ्यांवर झाडलेल्या गोळ्या कोणत्या शस्त्रातील आहेत, याची चौकशी अधिकाऱ्यामार्फत किंवा न्यायालयामार्फत का केली नाही, या माझ्या प्रश्नाचे उत्तर निकम यांनी द्यावे,’’ असे आव्हान आंबेडकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.