मुंबई ः पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकार-कामगारांना कोरोनाकाळात आर्थिक मदत देणाऱ्या अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कोरोनायोद्ध्यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विविध इस्पितळांमधील डॉक्टर, परिचारिका, वार्ड बॉईज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट्स पुरविणाऱ्या दानशूर व्यक्ती अशा कोरोनायोद्ध्यांचा सत्कार राजभवनात करण्यात आला.
निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांच्यासह भाभा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव, परिचारिका दीपाली इंदुलकर, सफाई कर्मचारी उदयकुमारी चरमर, जसलोक रुग्णालय येथील परिचारिका सोनल घुमे, आरोग्यसेविका लतिका नकते, फादर कॉसमॉस एक्का, होली स्पिरीट इस्पितळाच्या कार्यकारी संचालिका स्नेहा जोसेफ, ट्राफिक वार्डन अनिता लोबो, वैद्यकीय अधिकारी संजय फुंदे, वार्ड अधिकारी सुरेंद्र सिंग, संदीप मुर्जानी, देवयानी वैद्य, जैन संघटनेचे संजय दोषी, रेडिओलॉजिस्ट डॉ. पूजा राजेश छेडा, किशोर मन्याल, महावीर रुग्णालयाचे प्रकाश कोठारी यांचा सत्कार करण्यात आला.
कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. समाजातील प्रत्येक घटकाचे कार्य सारखेच महत्त्वाचे असते. कोरोना देशातून लगेचच जाण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यापुढेही कोरोनायोद्ध्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सेवाकार्य सुरू ठेवावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.
Prashant Damle honored for helping behind the scenes artists during the Corona period
-----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.