"भाजपशी जुळवून घ्या? का? म्हणजे आम्ही पैसे खायला मोकळे होऊ?"

शिवसेना नेत्याच्या 'लेटरबॉम्ब'वर मांडलं रोखठोक मत
"भाजपशी जुळवून घ्या? का? म्हणजे आम्ही पैसे खायला मोकळे होऊ?"
Updated on

शिवसेना नेत्याच्या 'लेटरबॉम्ब'वर मांडलं रोखठोक मत

मुंबई: महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) काँग्रेसने (Congress) आगामी निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला. त्यातच शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसवर (Congress) पक्ष कमकुवत करण्याचा आरोप तर केलाच पण त्याचसोबत 'शिवसेनेने भाजपसोबत (BJP) जावं कारण त्यातच शिवसेनेचे हित आहे', असा विचारही मांडला. या मुद्द्यावरून सध्या राजकारण पेटलं असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली. (Pratap Sarnaik Letterbomb Shivsena BJP Friendship Anjali Damania slams leaders)

"भाजपशी जुळवून घ्या? का? म्हणजे आम्ही पैसे खायला मोकळे होऊ?"
"भाजपचे लोक म्हणजे शत्रू नाहीत"; शिवसेना नेत्याचं मोठं विधान

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्बवरून सेनेत दोन गट पाहायला मिळत आहेत. "काय गंमत आहे पहा... जे सरनाईक आपल्या नेत्याशी (ठाकरेंशी) फोन वर किंवा WhatsApp वर सहज बोलू शकतात, ते या डिजिटल काळात पत्र लिहितात. हे तुम्हाला पटतय का? त्यात, ते पत्र मीडिया मध्ये कुठून व कसं येतं? भाजपशी जुळवून घ्या? का? म्हणजे आम्ही पैसे खायला मोकळे होऊ? काय किळसवाणे राजकारण", असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली.

"भाजपशी जुळवून घ्या? का? म्हणजे आम्ही पैसे खायला मोकळे होऊ?"
प्रताप सरनाईकांच्या पत्रावर संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया

नक्की काय लिहिलंय त्या पत्रात...

'महाराष्ट्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविणार हा वंदनीय शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेबांना दिलेला शब्द व त्यांना दिलेले वचन पूर्ण झालेले आहे. आपण या पदाला न्याय दिला आहे व देत आहात. पण या परिस्थितीतही जे राजकारण सुरु आहे त्यात सत्तेत एकत्र राहून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर या स्थितीत पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेले बरे, असे वैयक्तिक मत आहे. निदान यामुळे प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे. कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे "माजी खासदार" झालेल्या नेत्यांकडून जी बदनामी सुरु आहे, त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल', असं पत्रात लिहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.