'पहेले मंदिर फिर सरकार' असे म्हणणारे मंदिरे खुली करण्याबाबत गंभीर नाही

'पहेले मंदिर फिर सरकार' असे म्हणणारे मंदिरे खुली करण्याबाबत गंभीर नाही
Updated on

मुंबई ः पहेले मंदिर फिर सरकार असे म्हणणारे आता राज्यातील मंदिरे उघडण्यापासून दूर का पळत आहेत याची कारणे लोकांना कळली पाहिजेत. अहंकाराने भरलेले हे सरकार कोणत्याच बाबतीत गंभीर नाही, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. 

महाविकास आघाडीचे सरकार बनल्यानंतर या सरकारमधील व्यक्तींच्या भूमिका पूर्णपणे बदलल्या आहेत. राज्यभर झालेल्या तीव्र आंदोलनानंतर सरकारनं नियमावली बनवून मंदिरे उघडणे अपेक्षित होते, परंतु दुर्देवाने सरकार कुठल्याच विषयात गंभीर नाही. मंदिराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामान्यांना रोजगार उपलब्ध होतो. त्या लोकांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. हे सरकार अहंकाराने भरलेले आहे, लोकांना काय वाटते यापेक्षा आम्हाला काय वाटतं तेच करू यावर सरकारचा भर असतो. सरकारने मंदिर उघडली नाहीत आणि राज्यभर मंदिर खोलो आंदोलन सुरू झालं तर भाजपा त्यांच्यासोबत उभी राहिल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची राहील असा इशाराही दरेकर यांनी दिला.

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.