Prayag Raj : लेखक- दिग्दर्शक व अभिनेते प्रयाग राज यांचे निधन

1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फूल बने अंगारे' या चित्रपटाद्वारे प्रयाग राज शर्मा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत संवाद लेखक म्हणून प्रवेश
Prayag Raj
Prayag Rajsakal
Updated on

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते , लेखक आणि दिग्दर्शक प्रयाग राज शर्मा यांचे आज (ता.२३) संध्याकाळी निधन झाले. वयोमानानुसार ते सतत आजारी असायचे. अखेर आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या (ता. २४) दादर-शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फूल बने अंगारे' या चित्रपटाद्वारे प्रयाग राज शर्मा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत संवाद लेखक म्हणून प्रवेश केला. त्यांचा पहिला सुपरहिट चित्रपट होता राजेश खन्ना अभिनीत 'सच्चा झूठा'. या चित्रपटातील त्यांची चायवाला ही भूमिका देखील खूप प्रसिद्ध झाली होती. त्यांनी रामपूर का लक्ष्मण', 'रोटी', मर्द, देशप्रेमी, परवरीश यांसारख्या सुपरहिट चित्रपटाचे लेखन केले आहे.

Prayag Raj
IPS Vijay Raman passed away : निवृत्त आयपीएस अधिकारी विजय रमण यांचे निधन

अमिताभ बच्चन, कमल हासन आणि रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या 'गिरफ्तार' या चित्रपटाचे ते दिग्दर्शक होते. चित्रपटांमध्ये अभिनय करीत असताना त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांचे लेखन केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे पटकथा लेखक बनले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.