मुंबई : एसएमएसद्वारे पत्नीला तलाक देणाऱ्या पतीला मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. पती-पत्नीमधील मतभेद आणि वाद समुपदेशनाने सोडविणे शक्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. कोणत्याही प्रकारे तोंडी तलाक देण्याला केंद्र सरकारने रीतसर कायदा करून मनाई केली आहे. तरीही अदनान इकबाल मौलवी यांनी त्यांच्या पत्नीला एसएमएस पाठवून तिहेरी तलाक पद्धतीने तलाक दिला होता. याविरोधात पत्नीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. (MAHARASHTRA News)
मौलवी यांचा निकाह एप्रिल २०१५ मध्ये झाला होता; पण त्यानंतर नेहमीच पती आणि सासू-सासऱ्यांनी शारीरिक, मानसिक छळ केला आणि माहेराहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. ती माहेरी असताना मे महिन्यात पतीने तिला एसएमएस पाठवून तलाक दिला. पोलिस तक्रारीनंतर आरोपीने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला; मात्र जामीन मंजूर करण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिला.
त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका केली आहे. तक्रारदार पत्नीचे दागिने अद्यापही पतीच्या ताब्यात आहेत. त्यामुळे सत्र न्यायालयाने जामीन अमान्य केला असून, तपासाचे निर्देश दिले आहेत. पतीने पैशाची मागणी केली, अशी पत्नीची तक्रार आहे; मात्र यावर समुपदेशनामार्फत तोडगा काढला जाऊ शकतो, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.