मुंबईत उद्यापासून गर्भवती महिलांचे लसीकरण, ३५ केंद्रांची माहिती जाणून घ्या

ऑनलाईन रजिस्ट्रेशनसह 'वाॅक इन'ही करता येणार लसीकरण
Vaccination Pregnant woman
Vaccination Pregnant womansakal media
Updated on

मुंबई : मुंबईत उद्या ( गुरुवारपासून) गर्भवती महिलांचे लसीकरण (Pregnant Woman) करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून (State Government) पालिकेला कालच 45000 लसीचे डोस ( corona Vaccine) प्राप्त झाले आहेत. तर, बुधवारीही पालिकेला (BMC) आणखी लसीचे डोस मिळणे अपेक्षित आहे. मुंबईत (Mumbai) जवळपास दिड लाख गर्भवती महिला आहेत. महानगरपालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे (Dr Mangala Gomare) यांनी सांगितले की, गुरुवारपासून गर्भवती महिलांचे लसीकरण (Corona Vaccination) केले जात आहे. जवळपास 30 केंद्रांवर लसीकरण होणार आहे. (Pregnant Woman Corona Vaccination starts today online walk in also can take Dose)

प्रमुख वैद्यकीय रुग्णालये, प्रसूतीगृह आणि काही उपनगरीय रुग्णालयात लसीकरण केले जाईल. प्रसूतीगृहातील ओपीडीत जाणार्‍या गर्भवतींचे समुपदेशन केले जात आहे. शिवाय, लसीकरण केंद्रांवरही त्यांना लसीकरणाविषयीची माहिती दिली जाईल. त्यानंतर, त्यांचे लसीकरण केले जाईल. गर्भवती महिलांना लस देताना कर्मचार्‍यांना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी प्रशिक्षण दिले गेले आहे.

Vaccination Pregnant woman
20 % पुरुषांनी लाॅकडाऊनमध्ये केला स्वयंपाक; धूम्रपान, मद्यपानही सोडले

मॅटर्निटी होममध्येही लसीकरण

गर्भवती महिलांच्या लसीकरणाची वेळ सामान्य नागरिकांच्‍या वेळेतच असणार आहे. मुंबईतील गर्भवती महिलांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी पालिकेने त्यांच्या लसीकरणाची पूर्ण तयारी  केली आहे. पालिकेच्या मॅटर्निटी होममध्येही लसीकरण केले जाणार आहे.

गर्भवतींचे प्राधान्याने लसीकरण

डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, गर्भवती महिलांना लसीकरण केंद्रांवर प्राधान्याने लस दिली जाईल. ऑनलाईन रजिस्ट्रेशनसह वाॅक इन ही करता लसीकरण होईल. पण, सध्या वाॅक इनची सोय उपलब्ध आहे. रजिस्ट्रेशन केले तर लवकर लसीकरण होऊ शकेल.

गर्भवतींसाठी वेगळी सोय

या केंद्रांवर गर्भवती महिलांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांग आणि बसण्याची व्यवस्था असेल. शिवाय, केंद्रावर लसीचे फायदे आणि त्याचा प्रभाव नमूद करणारे लसपत्रिका उपलब्ध असतील. मुंबईत दीड लाखांहून अधिक गर्भवती महिला आहेत.  गर्भवतींचा लसीकरणासाठी वाढलेल्या प्रतिसादानुसार केंद्रांमध्ये वाढ केली जाईल. स्तनदा मातांचाही अजून कमी प्रतिसाद आहे. त्यानुसार, गर्भवतीही पहिल्या दिवशी जास्त गर्दी करतील असे वाटत नाही. त्यामुळे, सध्या पुरेसा साठा उपलब्ध नसला तरी लसीकरण सुरळीत होऊ शकेल असे ही डाॅ. गोमारे यांनी सांगितले.

Vaccination Pregnant woman
कृषी विद्यापीठांच्या शुल्क सवलतीबाबत कृषीमंत्री भुसे यांनी घेतला 'हा' निर्णय

राष्ट्रीय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीनुसार गरोदर महिलांचा कोविड लसीकरणात समावेश करण्यात आला असून विविध 35 ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

या कारणांसाठी लसीकरण महत्त्वपूर्ण

सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार,  ‘कोविड - 19’ या आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण इतर महिलांच्या तुलनेने गरोदर महिलांमध्ये अधिक होण्याची शक्यता असते. तसेच ‘कोविड - 19’ बाधित गरोदर महिलांमध्ये गरोदर काळ पूर्ण होण्याआधी प्रसूति होण्याचे प्रमाण अधिक आहे.  ‘कोविड - 19’ बाधित 90% गरोदर महिलांना दवाखान्यात भरती होण्याची गरज भासत नाही. परंतु सुमारे 10% गरोदर महिलांमध्ये गरोदरपणी मधुमेह, लठ्ठपणा, अधिक काळापासून असलेले श्वसनाचे आजार, प्रतिकारशक्ती विषयक औषधोपचार, डायलेसिस, हृदयरोग यामुळे ‘कोविड - 19' आजाराचा तीव्र संसर्ग होण्याचे प्रमाण वाढते व अचानक तब्येत ढासळल्यास त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची आवश्यकताही भासू शकते. दरम्यान, ‘कोविड - 19’ बाधित 95% मातांची नवजात बालके सुस्थितीत जन्मतात. तर उर्वरित 5% नवजात बालके प्रसूतीच्या अपेक्षित दिनांकापूर्वी जन्माला येऊ शकतात. अशा बालकांच्या बाबत त्यांना  रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासू शकते किंवा क्वचित प्रसंगी नवजात बालकाचा दुर्दैवाने मृत्यू ओढवू शकतो. या बाबींपासून गर्भवती महिलांचा आणि होणा-या बाळाचा बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घेणे फायदेशीर ठरु शकते.

या केंद्रांवर होणार लसीकरण

ए विभाग - कामा रुग्णालय, फोर्ट

२. ई विभाग - बा.य.ल. नायर धर्मार्थ रूग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई सेन्ट्रल

३. ई - जगजीवनराम पश्चिम रेल्वे रूग्णालय, भायखळा

४. ई विभाग - जे. जे. रूग्णालय, भायखळा

५. ई विभाग - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्य रेल्वे रूग्णालय, भायखळा

६. एफ उत्तर विभाग - मुंबई पोर्ट ट्रस्ट, वडाळा

७. एफ उत्तर विभाग - लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रूग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय, शीव

८. एफ दक्षिण विभाग - राजे एडवर्ड स्मारक रूग्णालय आणि सेठ गो. सुं. वैद्यकीय महाविद्यालय, परळ

९. एफ दक्षिण विभाग – एम. जी. एम. रुग्णालय, परळ

१०. एफ दक्षिण विभाग - नायगाव प्रसूतिगृह

११. जी उत्तर विभाग - माहीम सूतिकागृह, माहिम

१२. जी दक्षिण विभाग - ई. एस. आय. एस. रुग्णालय, वरळी

१३. एच पूर्व विभाग - विष्णूप्रसाद नंदराय देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, सांताक्रूझ (पूर्व)

१४. एच पश्चिम विभाग - के. बी. भाभा रूग्णालय, वांद्रे (पश्चिम)

१५. के पश्चिम विभाग - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रु. न. कुपर रूग्णालय, जुहू – विलेपार्ले (पश्चिम)

१६. के पूर्व विभाग - शिरोडकर प्रसूतिगृह, विलेपार्ले

१७. एल विभाग - खान बहादूर भाभा मनपा रुग्णालय, कुर्ला भाभा, कुर्ला (पश्चिम)

१८. एल विभाग - माँ साहेब मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह, चुनाभट्टी

१९. एम पूर्व विभाग - देवनार प्रसूतिगृह

२०. एम पश्चिम विभाग - पं. मदनमोहन मालविय शताब्दी रूग्णालय, गोवंडी (पूर्व)

Vaccination Pregnant woman
पोलिस आयुक्तांचा आक्षेप तरी २२ लाखांची लाच घेतलेला PI पुन्हा सेवेत

२१. एम पूर्व विभाग - बी. ए. आर. सी. रुग्णालय, चेंबूर

२२. एम पूर्व विभाग - आर. सी. एफ. हॉस्पिटल

२३. एन विभाग - मातोश्री रमाबाई ठाकरे प्रसूतिगृह

२४. एन विभाग - संत मुक्ताबाई मनपा सर्वसाधारण रुग्णालय, घाटकोपर (पश्चिम)

२५. एन विभाग - सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमीदास व्होरा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी घाटकोपर (पूर्व)

२६. पी उत्तर विभाग - चौक्सी प्रसूतिगृह, मालाड

२७. पी उत्तर विभाग - मनोहर वामन देसाई मनपा सर्वसाधारण रूग्णालय, मालाड (पूर्व)

२८. पी उत्तर विभाग - रिद्धी गार्डन मनपा दवाखाना

२९. आर मध्य विभाग - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मनपा सर्वसाधारण रूग्णालय, बोरीवली

३०. आर मध्य विभाग - चारकोप विभाग 3 प्रसूतिगृह

३१. आर दक्षिण विभाग - आकुर्ली प्रसूतिगृह, कांदिवली

३२. आर दक्षिण विभाग - भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मनपा सर्वसाधारण रूग्णालय, कांदिवली (पश्चिम)

३३. आर दक्षिण विभाग - इ. एस. आय. एस. रूग्णालय, कांदिवली

३४. एस विभाग - एल. बी. एस. प्रसूतिगृह

३५. टी विभाग - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मनपा रूग्णालय, मुलुंड (पूर्व)

या सूचना महत्त्वाच्या

लसीकरण केंद्रात गर्भवती महिला गर्भधारणेनंतरच्या पूर्ण कालावधींतर्गत लस घेऊ शकतात. प्रत्येक गरोदर महिलेने या संदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी व पूर्ण माहितीपश्चात स्वेच्छेने )लसीकरण करवून घ्यावे. ज्या महिलांना ‘कोविड - 19’ प्रादुर्भाव होऊन गेलेला असेल व ज्या महिलांना ‘मोनॉक्लोनल  ऑंटीबोडीज’ किंवा प्लाजमा हा उपचार घेतलेला असेल, अशा महिलांना 12 आठवड्यानंतर लसीकरण करून घेता येईल. कोविड - 19’ लसीकरणानंतर, काही लाभार्थ्यांमध्‍ये सौम्य स्वरुपाचा ताप, इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणं किंवा 1 ते 3 दिवस अस्वस्थ वाटण्याची भावना दिसून येऊ शकते.  तुरळक स्वरूपात 1 ते 5 लाख लोकांमधील एखादया लाभार्थ्‍यास लसीकरणानंतर 20 दिवसापर्यंत गंभीर लक्षणे आढळून येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.