स्वच्छ सर्वेक्षणाची नवी मोहीम

नवी मुंबई महापालिकेची २०२२ च्या सर्वेक्षणाची पूर्वतयारी
Navi Mumbai
Navi MumbaiSakal
Updated on

नवी मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या (Independence) निमित्ताने १५ ऑगस्टपासून (15 August) नवी मुंबई महापालिका (NMMC) २०२२-२३ करिता स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम नव्याने सुरू (Newly Start) करीत आहे. विशेष म्हणजे २०२०-२१ करिता झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणाचा निकाल अद्याप लागलेला नाही, परंतु दरम्यानच्या काळात शहरातील नागरिक, महापालिकेचे (Municiple) अधिकारी व कर्मचारी यांना लागणाऱ्या स्वच्छतेच्या सवयी मोडू नयेत, याकरिता महापालिका आयुक्त अभिजित बांगर (Abhijeet Bangar) यांनी पूर्वतयारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असणाऱ्या स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेत नवी मुंबई महापालिकेने सलग पाच वेळा राज्यातून पहिला क्रमांक पटकावला आहे. २०१९ मध्ये नवी मुंबईचा देशात सातवा आणि २०२० मध्ये देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. दरवर्षी केंद्र सरकारतर्फे २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा जाहीर केली जाते. त्यानंतर प्रत्येक राज्यात स्वच्छता सर्वेक्षणाची मोहीम सुरू होते.

Navi Mumbai
स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख केंद्र

महापालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापन विभाग, अभियांत्रिकी विभाग आदी विभागांमार्फत युद्धपातळीवर विकासकामे आणि सुशोभीकरणाची कामे करून शहरात मोहिमेला व्यापक रूप दिले जाते. २०२० मध्ये देशात कोविड १९ ने शिरकाव केल्यानंतर निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीतही पालिकेने स्‍वच्छता मोहीम सुरू ठेवली होती. शहरात कोविडशी प्रशासनाची झुंज सुरू असताना पिण्याच्या पाण्याचे नियोजन, कचरा व्यवस्थापन व विघटन, वृक्षलागवड, रस्ते व पदपथांची दुरुस्ती आणि देखभाल करणे, मैदाने, उद्याने, हरित पट्टे निर्माण करणे आदी विकासकामे महापालिकेने पूर्ण केली.

मलनिःसारण वाहिन्यांचे व्यवस्थापन आणि इतर कामांच्या दर्जाबाबत नागरिकांचे फोनवरून अभिप्राय व प्रत्यक्ष घटनास्थळी घेण्यात आलेले अभिप्राय असे सर्व टप्पे महापालिकेने पार केले आहेत. गतवर्षी हागणदारीमुक्‍त शहर या योजनेत महापालिकेला मिळालेले डबल प्लस आणि फाईव्ह स्टार दर्जा असलेले राज्यातील एकमेव शहर, लोकांचा अभिप्राय अशा विविध मानांकनांमुळे नवी मुंबई शहर देशात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते.

Navi Mumbai
आंबेडकरी चळवळीचे केंद्र ज्ञानसंग्रह वाचनालय

चुका सुधारणार नवी मुंबई शहरात कचरा वर्गीकरणाचे प्रमाण ८० टक्के आहे, परंतु त्यात आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीने महापालिका काम करणार आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे प्रमाण १०० टक्के करायचे आहे. शहरातील रस्ते व पदपथ कचरा कुंडीमुक्त करायचे आहेत. सध्या शहरात सुमारे १०० कुंड्या आहेत, परंतु कचरा कुंडीत टाकण्याऐवजी आहे त्याच ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करण्यावर अधिक भर देण्याचा महापालिकेचा उपक्रम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.